लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरोरा तालुक्यातील वायगाव (भोयर) येथील शेतकरी विजय झाडे हे शुक्रवारी सकाळी शेतातून घरी परत जात असताना दडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. यात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. झाडे आपल्या शेतात रात्री जागलीसाठी गेले होते. सकाळी परत येत असताना झुडुपात दडलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झेप घेतली. आपल्यावरील हल्ला कसाबसा परतवून लावत झाडे यांनी गावाकडे धाव घेतली. ही घटना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील आहे.रामदेगी येथे बिबट्याने सलग दोन दिवस दोन व्यक्तींचा बळी घेतला होता. यात बफर क्षेत्रात खेळण्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका युवकाला बिबट्याने ठार केले होते तर एका बुद्ध विहारात वास्तव्याला आलेल्या भन्तेजींचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या बिबट्याला पकडण्याची वनविभागाकडे नागरिकांनी मागणी केली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; चंद्रपुरातील तिसरी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 10:50 IST
वरोरा तालुक्यातील वायगाव (भोयर) येथील शेतकरी विजय झाडे हे शुक्रवारी सकाळी शेतातून घरी परत जात असताना दडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. यात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत.
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; चंद्रपुरातील तिसरी घटना
ठळक मुद्देरामदेगी परिसरात बिबट्याने मांडले ठाणनागरिक भयकंपित