शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सरपंचांना यावे लागले समोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 23:42 IST

वाढोणा ग्रामपंचायतअंतर्गत सोनापूर तुकूम नावाचे एक गाव आहे. या गावात राहणाऱ्या एका कुटुंबातील व्यक्तीचे (वय ७५) तीन दिवसांपूर्वीच निधन झाले. कोरोनानेच त्यांचे निधन झाले असावे, या समजुतीतून कोणीच अंत्यसंस्कारासाठी पुढे आले नाही. शेवटी सरपंच देवेंद्र गेडाम यांनी पुढाकार घेत सहकाऱ्यांच्या मदतीने अंत्यसंस्कार आटोपले व घरच्या अन्य लोकांना कोरोना तपासणीच्या सूचना दिल्या.

ठळक मुद्देमृत्यू कोरोनाने झाल्याचा कुटुंबीयांना संशय : कुटुंबातील कुणीही पुढे येईना

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तीन दिवसांपूर्वीच वडिलांचे निधन झाले आणि बुधवारी मुलाचे. घांचाही   कोरोनानेच झाला असावा, या संशयावरून त्यांच्या मृतदेहाजवळ येण्यास कोणीच तयार होईना. अशा परिस्थितीत सरपंच देवेंद्र गेडाम यांनी पुढे येत आधी वडील व नंतर मुलाचे अंत्यसंस्काराचे संपूर्ण सोपस्कार पार पाडले.वाढोणा ग्रामपंचायतअंतर्गत सोनापूर तुकूम नावाचे एक गाव आहे. या गावात राहणाऱ्या एका कुटुंबातील व्यक्तीचे (वय ७५) तीन दिवसांपूर्वीच निधन झाले. कोरोनानेच त्यांचे निधन झाले असावे, या समजुतीतून कोणीच अंत्यसंस्कारासाठी पुढे आले नाही. शेवटी सरपंच देवेंद्र गेडाम यांनी पुढाकार घेत सहकाऱ्यांच्या मदतीने अंत्यसंस्कार आटोपले व घरच्या अन्य लोकांना कोरोना तपासणीच्या सूचना दिल्या. तीन दिवसांनंतर बुधवारी मुलाची (वय ५०) प्रकृती खालावली. सरपंच गेडाम यांना गावातून कळविण्यात आले. ते लगेच सोनापूर तुकूम येथे पोहोचले व एकंदर परिस्थिती बघून गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रास ही माहिती दिली. रुग्णवाहिका गावात पोहोचली. मात्र रुग्णवाहिका दारात पोहोचत नाही, तोच मुलाचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी पुन्हा वडिलांसारखीच परिस्थिती उद्भवली. पुन्हा सरपंच देवेंद्र गेडाम यांना पुढाकार घ्यावा लागला. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून पीपीई कीट मागवून ग्रामपंचायतीचे तीन कर्मचारी व एका ग्रा. पं. सदस्याच्या मदतीने मुलावरही अंत्यसंस्कार आटोपले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू