शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जिल्हास्तरीय क्रीडा संमेलन रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:00 IST

स्वयंअध्ययन सराव पुस्तिकेचा विषय पुढे आला. ही पुस्तिकेच्या स्वरूपाचे सामर्थ्य लक्षात येताच पुढील सत्रापासून विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य करण्याची सूचना सभापती कारेकर यांनी केली. अन्य सदस्यांनी दुजोरा दिल्याने याबाबत निर्णय घेण्यात आला. योगिता डबले यांनी शैक्षणिक दिनदर्शिका प्रकाशित का झाली नाही, असा प्रश्न विचारला असता तयारी सुरू असल्याचे सभेत सांगण्यात आले.

ठळक मुद्देजि. प. शिक्षण समितीचा ठराव : स्वयंअध्ययन सराव पुस्तिका अनिवार्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी पहिल्या वर्गाला अत्यंत महत्त्व असल्याने पुढील सत्रापासून स्वयंअध्ययन सराव पुस्तिका अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जि. प. परिषद शिक्षण समितीच्या मंगळवारच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी यापूर्वी तयार केलेले प्रेरणादायी शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतच नसल्याचा आरोप काही सदस्यांनी केल्यावर त्याबाबत चर्चा झाली. विलंब झाल्याने यंदाचे जिल्हास्तरीय संमेलन अखेर रद्द करण्याचा ठरावही पारित करण्यात आला.जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांची निवडणूक झाल्यानंतर उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीच्या सभापती रेखा कारेकर यांच्या उपस्थितीत पहिलीच बैठक पार पडली.या बैठकीत शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला. शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढत असल्याने जि. प. शाळेत पहिल्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या बालकांचा पाया कच्चा असेल तर पुढील शिक्षणात टिकणे कठीण होईल, या हेतूने सभापती रेखा कारेकर यांनी उपस्थित शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.त्यावेळी स्वयंअध्ययन सराव पुस्तिकेचा विषय पुढे आला. ही पुस्तिकेच्या स्वरूपाचे सामर्थ्य लक्षात येताच पुढील सत्रापासून विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य करण्याची सूचना सभापती कारेकर यांनी केली. अन्य सदस्यांनी दुजोरा दिल्याने याबाबत निर्णय घेण्यात आला. योगिता डबले यांनी शैक्षणिक दिनदर्शिका प्रकाशित का झाली नाही, असा प्रश्न विचारला असता तयारी सुरू असल्याचे सभेत सांगण्यात आले. शालेय पोषण आहार, भरारी पथक, मद्यपी शिक्षकांवरील कारवाई विषयांवरही चर्चा झाली. यावेळी सदस्य रणजित सोयाम, गोपाल दडमल, मेघा नलगे, कल्पना पेचे, योगिता डबले, तज्ज्ञ सदस्य जे. डी. पोटे, शिक्षणाधिकारी (माध्य.) संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (निरंतर) मोहन पवार व सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषद