एक वर्ष लोटूनही शेतकरी बारदानांच्या रकमेपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:21 IST2021-06-01T04:21:39+5:302021-06-01T04:21:39+5:30
सावरगाव येथे मागील अनेक वर्षांपासून आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यरत आहे. मागील वर्षी २०२० मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ...

एक वर्ष लोटूनही शेतकरी बारदानांच्या रकमेपासून वंचित
सावरगाव येथे मागील अनेक वर्षांपासून आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यरत आहे. मागील वर्षी २०२० मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाचे उत्पादन घेतले होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी आदिवासी सोसायटीत धान्य विक्रीसाठी आणले असता बारदाना नसल्याचे संस्थेमार्फत सांगण्यात आले. मात्र शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशाने बारदाना खरेदी करून धान्य विक्री केल्यास बारदान्याचे पैसे शासनाकडून परत मिळतील, असे संस्थेकडून सांगण्यात आले. त्यानुसार सावरगाव, चिखलगाव, वलनी येथील एकूण २१० शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशाने बारदाना खरेदी करून धान्य विक्री केली. या शेतकऱ्यांच्या बारदान्याची एकूण रक्कम १९ हजार ५८७ रुपये एवढी आहे. मात्र आजघडीला एक वर्ष लोटूनसुद्धा बारदान्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाने जमा केलेली नाही.
कोट
शासनाने हमी दिल्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतः बारदान खरेदी करून धान्य विक्री केली. मात्र एक वर्ष वाट पाहूनसुद्धा पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले नाही.
- बाजीराव कोहरे, शेतकरी, सावरगाव