नेताजी चौक बाबूपेठ येथे पोलीस बिट स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:31 IST2021-09-22T04:31:34+5:302021-09-22T04:31:34+5:30

चंद्रपूर : नेताजी चौक, बाबूपेठ परिसरात प्राणघातक हल्ला झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे पोलीस बिट ...

Establish a police bit at Netaji Chowk Babupeth | नेताजी चौक बाबूपेठ येथे पोलीस बिट स्थापन करा

नेताजी चौक बाबूपेठ येथे पोलीस बिट स्थापन करा

चंद्रपूर : नेताजी चौक, बाबूपेठ परिसरात प्राणघातक हल्ला झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे पोलीस बिट सुरू करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत जागेची व्यवस्था करून देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मनपा पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत निवेदन दिले.

शहरातील बाबूपेठ परिसरातील वैष्णवी आंबटकर या युवतीची निर्घृण हत्या झाली. मृत्यूप्रकरणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आंबटकर कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. वैष्णवीच्या हत्येप्रकरणी प्रशासनाप्रती रोष निर्माण झाल्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नये, याकरिता नागरिकांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे परिसरात एक पोलीस बिट स्थापन करण्याची मागणी केली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा कार्यालयातर्फे पोलीस विभागास एक पोलीस बिट स्थापन करण्याकरिता जागेची व्यवस्था करून देण्याबाबत या कार्यालयास सूचना केल्या. ही परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेकरिता नेताजी चौक, बाबूपेठ या परिसरात पोलीस बिट उपलब्ध व्हावे, त्याकरिता चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत जागेची व्यवस्था करून देण्यात येणार आहे. पोलीस बिट तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याकडे केली.

Web Title: Establish a police bit at Netaji Chowk Babupeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.