शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन

By admin | Updated: April 14, 2016 01:05 IST

महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मंजूर करण्यात याव्या आणि कर्मचाऱ्यांप्रति शासनाने सहानुभूती दाखवावी,....

उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : न्याय मागण्या तत्काळ मंजूर करण्याची मागणीबल्लारपूर : महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मंजूर करण्यात याव्या आणि कर्मचाऱ्यांप्रति शासनाने सहानुभूती दाखवावी, यासाठी बल्लारपूर येथील तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लेखणीबंद आंदोलन केले.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील उपविभागीय अधिकारी कल्पना निळ यांना निवेदन सादर केले.राज्य महसूल कर्मचारी संघटना कित्येक दिवसांपासून सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्याची मागणी करीत आहे. मात्र राज्य सरकार महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागत आहे. याचा विपरित परिणाम महसूल प्रशासनाशी निगडित जनतेच्या कामकाजावर होत आहे. राज्याच्या प्रशासनात महसूल विभाग महत्त्वाचा घटक आहे. याच विभागावर प्रशासनाचा आर्थिक डोलारा उभा आहे. परंतु या विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे शासनस्तरावरुन डोळेझाक केली जात आहे.शासनस्तरावर न्याय मागण्याचा निर्णय जोपर्यंत लागणार नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे, असे संघटनेने म्हटले आहे. नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, महसूल विभागातील लिपीकांना महसूल सहायक म्हणून मान्यता देण्यात याावी, नायब तहसीलदारांची पदे पदोन्नतीने भरण्यात यावी. कोतवालांना चर्तुथ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, यासह एकूण २६ मागण्या शासनाकडे लावून धरण्यात आल्या आहेत. न्याय मागण्या सरकारने लागू कराव्या, अशी अपेक्षा अजय मेकलवार यांनी व्यक्त केली.महसूल कर्मचाऱ्यांच्या भावना व मागण्याची सोडवणूक करण्यात याावी म्हणून उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अजय मेकलवार, कुणाल सोनकर, जी.एम. मेश्राम, एम.टी. वादीकर, दत्तराज कुळसंगे, पी.आर. अडबाले, पोर्णिमा नैताम, व्ही.एन. उईके, राजू अंडेलकर, शोभा मुंडरे, ए.एच. गोहणे, निलेश मत्ते, एस.बी. वाढई यांच्या समावेश होता. विशेष म्हणजे मागील आठवड्यात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला होता. लेखनीबंद आंदोलनामुळे नागरिकांची कामे खोळंबत आहेत. (शहर प्रतिनिधी)