शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
5
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
6
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
7
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
8
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
9
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
10
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
11
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
12
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
13
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
14
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
15
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
16
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
17
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
18
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
19
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
20
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

दारुविक्रीविरूद्ध केळझर येथील महिलांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 11:15 PM

आजचा बालक हा उद्याचा भविष्यकाळ असल्याने संस्कारित पिढी निर्माण व्हावी, असे अनेकांच्या आई- वडिलांना वाटते. मात्र परिसरातील वातावरण दूषित होत गेले तर संस्कारक्षम बालके घडणे अशक्य आहे.

ठळक मुद्देतंटामुक्त समिती झाली सक्रिय : दारुबंदीसाठी महिलांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : आजचा बालक हा उद्याचा भविष्यकाळ असल्याने संस्कारित पिढी निर्माण व्हावी, असे अनेकांच्या आई- वडिलांना वाटते. मात्र परिसरातील वातावरण दूषित होत गेले तर संस्कारक्षम बालके घडणे अशक्य आहे. हेच हेरुन मूल तालुक्यातील केळझर येथील महिलांनी गावात पसरलेले व्यसनाधीनतेचे वाढलेले प्रस्थ उखडून टाकण्याचा चंग बांधला. हातभट्या व देशी दारुची होणाºया बेभाव विक्रीवर पायबंध घालण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष सुरेखा चुनारकर व त्यांच्या सहकारी महिलांनी एल्गार पुकारला. त्यामुळे आश्चर्य काय, दारुची अवैध विक्री करणाºयाचे धाबेच दणाणले.महिलांवर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. मात्र त्या आया घाबरल्या नाही. पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याचे बघून गावातील ७५ महिला जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांना भेटून दारुबंदीसाठी सहकार्य मागितले. गावात वाढत चाललेल्या व्यसनाधिनतेत भविष्यातील भावी पिढी गारद होऊ नये, यासाठी मुलांच्या भवितव्यासाठी आयांचा दारुबंदीसाठीचा एल्गार कौतुकास्पद व प्रेरणादायी होता. केळझर हे गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजले जाते. तालुक्याच्या एका टोकाला असलेल्या या गावात हातभट्या तसेच देशी दारुची बेभान विक्री करण्याची जणू स्पर्धाच दिसून येते.या गावात काही महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात दारूविक्री व्हायची. मात्र १५ आॅगस्टला महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी येथील सुरेखा चुनारकर यांनी निवड झाली. तेव्हा त्यांनी गावात गावठी दारु व देशी दारुचे प्रस्थ वाढत असून भविष्यात आपली मुले व्यसनाधिनतेकडे वळतील यासाठी पुरुषाऐवजी आपणच कंबर कसली पाहिजे, हा विचार काही महिलांच्या मनात आला. यामुळे व्यसनाधिनतेचा समूह उच्चाटन करण्याचा निर्धार महिलांनी केला.तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष सुरेखा चुनारकर यांच्या समवेत सरपंच सुनिता मानकर, गावातील महिला सुषमा मानकर, उज्ज्वला शेंडे, सरिता डोंगरे, शिला निमगडे, वच्छला खोब्रागडे, कमला रायपूरे, सरला निकोडे, गिता निकोडे, मंगला निकोडे, निता भेंडारे आदी महिलांनी दारुबंदीसाठी एल्गार पुकारला. त्यांनी गावातील दारुच्या १० ते १२ हातभट्ट्या उद्धवस्त केल्या. २५ लोकांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र पोलिसांकडून काही प्रमाणात सहकार्य मिळत नसल्याचे बघून ७५ महिला जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांची भेट घेऊन गावातील अवैध दारुविक्रीबाबत माहिती दिली. तेव्हा पोलीसही सहकार्य करण्यासाठी पुढे सरसावले. गावात आजही अवैध दारुची विक्री केली जात आहे. महिलांना अश्लील भाषेत बोलून जिवे मारण्याची धमकी देतात. मात्र महिलांचा एल्गार कायम आहे.