शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

हत्तीरोग औषध वितरण मोहीम थांबवली ! वितरण करताना तुटू लागल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 14:41 IST

Chandrapur : जिल्ह्यातील हत्तीरोग औषधोपचार मोहीम, गोळ्या दिल्लीला पाठवल्या

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातून सर्वाधिक हत्तीरोगाचे ९ हजार ३२१ रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात आढळून आल्याने आरोग्य विभागाने सोमवारपासून (दि. १०) प्रतिबंधात्मक गोळी वितरण मोहीम सुरू केली होती. मात्र, स्ट्रीपमधून बाहेर काढताना गोळ्या तुटण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे ही मोहीम तडकाफडकी थांबवून राज्य शासनाला कळविले. राज्याकडून दिल्लीला अहवाल गेल्याने २९ लाख ९७ हजार गोळ्या रिप्लेस करून देण्याचा संयुक्त निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतला आहे.

राज्यातून सर्वाधिक रुग्णसंख्या चंद्रपूर जिल्ह्यात असल्याने हा जिल्हा अतिसंवेदनशील म्हणून घोषित झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, हत्तीरोग दुरीकरणासाठी सोमवारपासून सार्वत्रिक औषधोपचार मोहीम सुरू करण्यात आली. २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत ११ लाख ९४ हजार ३५७पात्र नागरिकांना गोळ्या खाऊ घालण्याचे नियोजन होते. चंद्रपूर ग्रामीण, भद्रावती, राजुरा, पोंभुर्णा, गोंडपिपरी, मूल, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी व विमूर या १० तालुक्यांत रुग्णसंख्या अधिक असल्याने विशेष फोकस ठेवला. आरोग्य पथक घरोघरी भेट देऊन नागरिकांना गोळ्या खाऊ घालत होते. दरम्यान, स्ट्रीपमधून गोळी काढली की तुटत असल्याचे दिसून आले. पथकाने ही बाब जिल्हा हत्तीरोग प्रतिबंधक अधिकारी डॉ. प्रकाश साठे यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी राज्य शासन व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांना माहिती दिली. त्यानंतर मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार, नवीन गोळ्या येईपर्यंत मोहीम तत्काळ थांबविण्यात आली आहे.

नवीन गोळ्या आल्यानंतर सुरू होणार मोहीमनवीन गोळ्या आल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा मोहीम सुरू होईल. जिल्ह्यातील १०३० गावांत व २२ वॉर्डातील १२ लाख ५४ हजार ५१० पैकी ११ लाख २४ हजार ३५७ पात्र व्यक्तींना गोळ्या खाऊ घालण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी केले.

११ लाख ९४ हजार ३५७ नागरिकांना गोळ्या खाऊ घालणारमोहिमेसाठी २१ व २२ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रत्येक गावांत एक बूथ याप्रमाणे एकूण १ हजार २५३ बूथ निश्चित केले. २ हजार २२० आरोग्य कर्मचारी, ३१५ पर्यवेक्षकांची नियुक्ती झाली

गोळ्यांतील 'कटेंट ओके'केंद्र सरकारच्या अधिनस्थ यंत्रणेकडून जिल्ह्यासाठी २९ लाख ९७ हजार प्रतिबंधात्मक गोळ्या पाठविल्या होत्या. गोळ्यांचे उत्पादन नियम व नामांकनानुसार 'कटेंट ओके' आहे, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला. गोळ्या स्ट्रीपमधून बाहेर काढताना तुटण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने मुंबईला कळविले. मुंबईने ही बाब दिल्लीच्या लक्षात आणून दिली.

"जिल्ह्याला प्राप्त झालेल्या गोळ्यांबाबत जी समस्या निर्माण झाली, ती माहिती शासनाला कळविण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसारच मोहीम थांबविण्यात आली."- डॉ. प्रकाश साठे, हत्तीरोग प्रतिबंधक अधिकारी, चंद्रपूर

"गोळ्यांमधील कटेंटबाबत शंका नाही. मात्र, वितरण करताना गोळ्या तुटण्याच्या घटना घडल्याने मोहीम थांबवली. सर्व गोळ्या रिप्लेस करून मिळणार आहेत. गोळ्या आल्यानंतर, सार्वत्रिक औषधोपचार मोहीम पुन्हा सुरू केली जाईल."- डॉ. अशोक कटारे, जिल्हा आरोग्य, अधिकारी, चंद्रपूर

अशी आहे रुग्णसंख्याब्रह्मपुरी                १५९७नागभीड               १०७१सावली                 १०३४चिमूर                   ९६७सिंदेवाही               ७७९वरोरा                   ५७३भद्रावती                ५५१मूल                      ४८७गोंडपिपरी             ४२३चंद्रपूर                  ३४९राजुरा                   ३२९पोंभुर्णा                  ३०८बल्लारपूर             २३३कोरपना                २१८जिवती                    १८मनपा क्षेत्र              ३८४एकूण                 ९३२१ 

टॅग्स :Healthआरोग्यchandrapur-acचंद्रपूर