शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

चांदली ग्रामपंचायतीची निवडणूक बेकायदेशीर

By admin | Updated: February 24, 2016 00:58 IST

चांदली येथील ग्रामपंचायतीची नुकतीच झालेली निवडणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य नंदलाल करंबे यांनी केला आहे.

नंदलाल करंबे यांचा आरोप : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारब्रह्मपुरी : चांदली येथील ग्रामपंचायतीची नुकतीच झालेली निवडणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य नंदलाल करंबे यांनी केला आहे.तालुक्यातील चांदली ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. सरपंच व उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम तहसीलदार यांनी ग्रामपंचायत अधिनियम १६४८ कलम ३५/३ अन्वये अविश्वास हस्तानुसार १६ फेब्रुवारी २०१६ ला निवडणूक घेतली. परंतु तहसीलदार व अपासी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून तारीख न ठरविता आपल्या अधिकारातून मनमानी कारभार करून निवडणूक घेतली आहे. कायद्याने जिल्हाधिकारी चंद्रपूर व उपायुक्त नागपूर विभाग यांचा आदेश न जूमानता मुदतीच्या आत तहसीलदारांनी सरपंच व उपसरपंचाची निवडणूक घेतली आहे. कायद्याने ग्रामपंचायत अधिनियम ३३/१ नुसार सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक तारीख व वेळ ठरविणे जिल्हाधिकारी यांच्या कक्षात येते. निवडणुकीचा कार्यक्रम तहसीलदार अथवा अध्यासी अधिकारी यांना ठरविण्याची कुठेही तरतूद नाही. मात्र त्यांनी कलम ३३/१ चा वापर न करता कलम ३५/३ चा वापर केला आहे, असे नंदलाल करंबे यांनी म्हटले आहे. वास्तविक पाहता कलम ३५/३ चा नियम या पदाच्या निवडणुकीसाठी लागू होत नाही. त्यामुळे अपुऱ्या कायद्याच्या आधारावर तहसीलदाराने निवडणूक घेऊन मनमानी कारभार केला असल्याचा आरोप नंदनलाल करंबे यांनी केला आहे. या निवडीची पूर्ण प्रक्रिया रद्द करून कायदेशिर निवडणुकीची प्रक्रिया राबविण्याची मागणी त्यांनी केली असून याबाबत एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्याचे म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)