२४ तासात आठ पॉझिटिव्ह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST2021-01-25T04:28:46+5:302021-01-25T04:28:46+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ९३६ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ३८० ...

२४ तासात आठ पॉझिटिव्ह आढळले
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ९३६ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ३८० झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ९४ हजार ७४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी एक लाख ६७ हजार ९६८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपुरातील गणेशनगर तुकूम येथील ६८ वर्षीय पुरूष व बाबूपेठ वार्ड येथील ७० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३८५ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३४९, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १३, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आढळलेल्या आठ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील चार, चंद्रपूर तालूका एक, बल्लारपूर एक, नागभीड एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे.