शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

झिरो बजेटमध्ये होणार जिल्ह्यात शिक्षण दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 05:00 IST

जिल्ह्यात व्हीएसटीएफ, मॅजिक बस, प्रथम समन्वयकांच्या माध्यमातून शिक्षण दान हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी गावातील पदवीधर युवकांनी निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी २ तास ते विद्यार्थ्यांना गावातच मार्गदर्शन करणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी वाढविली जाणार आहे.  विशेष म्हणजे, यासाठी कोणताही निधी खर्च केला जाणार नसून झिरो बजेटमध्ये  विद्यार्थ्यांना समजेल, अशा पद्धतीने शिकविले जाणार असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविली जाणार आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षांपासून विद्यार्थीशिक्षणापासून काही प्रमाणात दूर गेले आहे. सद्य:स्थितीत शाळा सुरू झाली असली तरी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहिजे तशी चांगली नाही. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी तसेच शैक्षणिक स्तर वाढवून त्यांना स्पर्धा परीक्षेला तयार करण्यासाठी सीईओ मिताली सेठी यांनी जिल्ह्यात शिक्षणदान हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामध्ये गावातील स्वयंसेवकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दररोज दोन तास नि:शुल्क शिकविले जाणार आहे. हा उपक्रम पुढील चार महिने सुरू राहणार आहे.जिल्ह्यात व्हीएसटीएफ, मॅजिक बस, प्रथम समन्वयकांच्या माध्यमातून शिक्षण दान हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी गावातील पदवीधर युवकांनी निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी २ तास ते विद्यार्थ्यांना गावातच मार्गदर्शन करणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी वाढविली जाणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी कोणताही निधी खर्च केला जाणार नसून झिरो बजेटमध्ये  विद्यार्थ्यांना समजेल, अशा पद्धतीने शिकविले जाणार असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविली जाणार आहे.

अशी आहे शिक्षण दान संकल्पनादान ही आपल्या देशातील परंपरा आहे. प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार काही तरी दान करत असतो. आपण समाजाचे काही देणे लागले, या भावनेतून एकत्र  येऊन आपल्या जवळ असलेले शिक्षण दान केले तर गावातील लहान मुलांना शिक्षणासाठी आपण सहकार्य करू शकतो. शिक्षण ही अशी संपत्ती आहे जी दान केली तरी संपत नाही, उलट वाढतच जाते. त्यामुळेच जिल्ह्यात शिक्षण दान ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे.

पुढील चार महिने  चालणार उपक्रमजिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये दररोज दोन तास स्वयंसेवकांच्या माध्यमातून शाळेच्या वेळेव्यतिरिक्त शिकविले जाणार आहे. हा कार्यक्रम पुढील चार महिन्यांपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, दोन महिन्यांनंतर आणि चार महिन्यांनंतर विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन प्रगती तपासणी जाणार आहे.

हे आहे लाभार्थीइयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिकणारे विद्यार्थी. प्रत्येक वर्गात १५ ते २० विद्यार्थी राहणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना भाषा, गणित शिकविण्यात येणार आहे. 

मागील दीड वर्षांपासून विद्यार्थी काही प्रमाणात शिक्षणापासून दूर गेले आहे. त्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणून त्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्ह्यात शिक्षण दान हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन त्यांची क्षमता तपासली जाणार आहे. त्यातील कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांना गरूडझेप अंतर्गत स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी कुठेच मागे राहू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.-मिताली सेठी सीईओ चंद्रपूर

 

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण