शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

किडनी रॅकेटचा तपास आता 'ईडी' करणार; डॉक्टरांचे आर्थिक व्यवहार आणि व्हॉट्सॲप चॅटिंग घेतले ताब्यात

By परिमल डोहणे | Updated: March 5, 2026 14:06 IST

Chandrapur : डॉ. रवींद्र पाल सिंग याने उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. २२ जानेवारी २०२६ पासून त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असून, ४ मार्चपर्यंत तब्बल ११ वेळा सुनावणी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : माजविणाऱ्या किडनी रॅकेट प्रकरणाचा : राज्यभर खळबळ तपास आता नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग आणि डॉ. राजरत्न गोविंदसामी यांच्यातील आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे आणि धक्कादायक व्हॉट्सअॅप चॅटिंग सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतली आहे. या पुराव्यांच्या आधारे आता दोन्ही डॉक्टरांवर 'मनी लाँड्रिंग'चा (अवैध मुद्रा विनिमय) गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली आहे.

नागभीड येथील रोशन कुळे किडनी शस्त्रक्रिया प्रकरणाच्या तपासात त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलचे कनेक्शन समोर आले होते. डॉ. रवींद्रपाल सिंग आणि डॉ. गोविंदसामी हे दोघे संगनमताने या शस्त्रक्रिया पार पाडत असत. एका शस्त्रक्रियेसाठी रुग्णांकडून लाखो रुपये उकळले जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष तपास पथकाने (एसआयटी) संकलित केलेले महत्त्वाचे पुरावे 'ईडी'ने मागविले होते.

नुकतीच ही सर्व कागदपत्रे 'ईडी'च्या स्वाधीन करण्यात आली असून, त्यामध्ये आरोपींच्या व्हॉट्सअॅप चॅटिंगचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, या चॅटिंगमध्ये 'हवाला' मार्फत पैशांची देवाणघेवाण झाल्याचे ठोस पुरावे आढळले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून लवकरच सक्तवसुली संचालनालय यावर मोठी कारवाई करण्याची चिन्हे आहेत.

डॉ. रवींद्रपाल सिंगच्या जामिनावर ११ मार्चला सुनावणी

डॉ. रवींद्र पाल सिंग याने उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. २२ जानेवारी २०२६ पासून त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असून, ४ मार्चपर्यंत तब्बल ११ वेळा सुनावणी झाली आहे. मात्र, न्यायालयाने अद्याप जामिनावर कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही.बुधवारी (४ मार्च) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पुन्हा एकदा पुढील तारीख दिली असून, आता ११ मार्च रोजी या अर्जावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kidney Racket Investigation Now by ED; Doctors' Transactions Under Scrutiny

Web Summary : The ED is now investigating the kidney racket, seizing financial records and WhatsApp chats of doctors. Allegations include money laundering via 'hawala'. Key evidence suggests illegal transactions, potentially leading to charges against involved doctors. Court hearings continue for bail.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र