शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

ग्रामीण भागाचे अर्थचक्र थांबले; मिरची सातरे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 11:45 AM

Chandrapur news मिरची नागभीड तालुक्यातील पीक नसेना का, पण याच मिरचीने या तालुक्यातील हजारो हातांना रोजगार उपलब्ध करुन दिला आणि तालुक्यातील अर्थचक्राला गती मिळाली. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूमध्ये हे मिरची सातरे रडारवर आल्याने बंद करण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे इतर व्यवसायही लॉकडाऊन

घनश्याम नवघडे

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर  : मिरची नागभीड तालुक्यातील पीक नसेना का, पण याच मिरचीने या तालुक्यातील हजारो हातांना रोजगार उपलब्ध करुन दिला आणि तालुक्यातील अर्थचक्राला गती मिळाली. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूमध्ये हे मिरची सातरे रडारवर आल्याने बंद करण्यात आले आहेत. परिणामी तालुक्याच्या ग्रामीण भागात मिरची सातऱ्यांच्या रूपाने सुरू असलेले अर्थचक्र थांबले आहे.

नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धान आहे. धान या एका पिकावरच तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. पण दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे या तालुक्यातील धान शेती भकास होत चालली आहे. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी या धोरणाने शेतकरीही हतबल झाले आहेत. उद्योगाच्या बाबतीत तर नागभीड तालुका कोसोदूर आहे. उद्योगविरहीत तालुका अशीच नागभीड तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे येथील तरुणांना आणि लोकांना शेतीची कामे संपली की, बेकारीचेच जीवन जगावे लागते. म्हणूनच तालुक्यातील हजारो मजूर कामाच्या शोधात जिल्ह्यात आणि दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर करीत होते. अशा परिस्थितीत नागभीड तालुक्यातील किमान ४० ते ५० गावात सुरु करण्यात आलेले मिरचीचे सातरे त्या परिसरातील मजुरांना दिलासा देणारे ठरले होते.

             हे मिरची सातरे पाहून अनेकांना समज होत होता की, ही मिरची एक तर भिवापूर येथून किंवा नागपूर जिल्ह्यातून येत असावी. पण हा समज पूर्णत: चुकीचा होता. या सातऱ्यावर येणारी मिरची आंध्रप्रदेशातून ट्रकांद्वारे आणली जात होती. तिथे मिरचीच्या मुक्या काढल्या जात होत्या. त्यासाठी एका बोरीवर मजुरांना ठराविक मोबदला दिला जात होता. एक जोडी दीड दिवसात एक बोरा मिरचीच्या मुक्या काढण्याचे काम करीत होती. आता हे सातरे गावातच असल्याने या मजुरांनी मुलांनाही या कामावर लावून घेतले होते. मिरची स्वच्छ झाली की, देशविदेशात निर्यात होत होती.

रोजगार हमीची कामेही बंद

शासनाने मग्रारोहयोच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचे कबूल केले असले तरी शासनाचे हे आश्वासन अभावानेच नागभीड तालुक्यात दिसून येते.

नागभीड तालुक्यात अगदी बोटावर मोजण्याइतके रोजगार हमी योजनेचे काम सुरू आहेत. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही.

जिथे मजूर तिथे सातरा

या मिरची सातऱ्यांचे एकंदर अवलोकन केले तर ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध होतात, त्या ठिकाणी हे मिरची सातरे सुरू करण्यात येतात. एका सातऱ्यावर किमान २०० ते ३०० मजूर काम करतात. काही गावात तर मजुरांची उपलब्धता लक्षात घेऊन दोन सातरे सुरू करण्यात आले होते. नागभीड तालुक्यात किमान ५० गावात मिरची सातरे असावेत. याचा अर्थ किमान १० हजार मजुरांची रोजी रोटी या मिरची सातऱ्यांवर अवलंबून होती. मात्र, लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यूने या रोजीरोटीवरच गदा आली आहे.

ग्रामपंचायतीकडे नोंद

या मिरची सातऱ्यांची नोंद तहसील कार्यालयाकडे करण्यात येत नाही. ती ग्रामपंचायतींकडे असते, अशी माहिती तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. त्यामुळे तालुक्यात नेमके किती सातरे आहेत, हे सांगता येणार नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :agricultureशेती