वरोरा परिसरात 3.2 रिश्टरच्या भूकंपाची नोंद; कोणतेही नुकसान नाही; आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 09:18 IST2025-09-25T09:16:51+5:302025-09-25T09:18:32+5:30
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, सदर भूकंपाच्या घटनेत सध्या तरी कोणतेही नुकसान झाल्याची नोंद नाही. तरीही प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

वरोरा परिसरात 3.2 रिश्टरच्या भूकंपाची नोंद; कोणतेही नुकसान नाही; आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची माहिती
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील परिसरात सोमवारी दुपारी भूकंप नोंद झाल्याची माहिती भूकंप ॲपमार्फत प्राप्त झाली. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.2 इतकी नोंद झाली असून, केंद्रबिंदू वरोरा तालुक्यातील परिसर असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
घटना घडल्यानंतर तत्काळ वरोरा परिसरातील मार्डा व एकोणा गावातील नागरिक, पोलीस पाटील व तलाठी यांच्यामार्फत खात्री केली असता कोणालाही भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे सांगण्यात आले. तसेच वेकोली खदान व्यवस्थापनानेही परिसरात कोणतीही हालचाल किंवा धक्का जाणवल्याचे निदर्शनास आलेले नाही, अशी माहिती दिली आहे.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, सदर भूकंपाच्या घटनेत सध्या तरी कोणतेही नुकसान झाल्याची नोंद नाही. तरीही प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.