अतिवृष्टीमुळे शेकडो एकर क्षेत्रातील पऱ्हे बांधातच सडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:07 IST2019-08-13T00:07:07+5:302019-08-13T00:07:29+5:30
तालुक्यात भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा हंगाम सुरू झाल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पऱ्हे उशीरा टाकले. पुरेसा पाऊस आल्यानंतर रोवणीला सुरू केल्या जाणार होती.

अतिवृष्टीमुळे शेकडो एकर क्षेत्रातील पऱ्हे बांधातच सडले
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : तालुक्यातील नेरी, कटारा (रिठ) व अन्य गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेकडो एकर क्षेत्रातील धान पºह्याला जोरदार फटका बसला आहे.
तालुक्यात भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा हंगाम सुरू झाल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पऱ्हे उशीरा टाकले. पुरेसा पाऊस आल्यानंतर रोवणीला सुरू केल्या जाणार होती. परंतु, चार दिवसांपूर्वी आलेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो एकर क्षेत्रातील पºहे वाहून गेले. नाल्याकाठावर शेती असणाऱ्या कटारा (रिठ) गुलाब श्रावण पिसे यांच्यासह अनेक शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. धाणाची शेती येथे आहे. या शेतीमध्ये धानाचे उत्पादन घेतल्या जाते त्याकरिता शेतकऱ्यांने धानाचे पऱ्हे टाकले. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे व परिवाराचे पालनपोषण कसे करावे, या चिंतेत शेतकरी हतबल झाले आहेत. गुलाब पिसे यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेकडून एक लाखाचे पीक कर्ज घेतले. पण सततच्या पावसामुळे धानाचे पऱ्हे सडले आहेत. हीच परिस्ेिथती अनेक शेतकऱ्यांबाबत घडली आहे.