शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
4
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
5
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
6
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
7
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
8
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
9
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
10
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
11
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
12
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
13
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
14
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
15
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
16
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
17
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
18
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
19
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही
20
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला

डॉ. शीतल आमटे यांची आनंदवनात आत्महत्या; का उचलले टोकाचे पाऊल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2020 1:46 AM

विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचल्याचा प्राथमिक अंदाज

प्रवीण खिरटकर

वरोरा (चंद्रपूर) :  कुष्ठरोगी, अंध, अपंग, निराधार व्यक्तींच्या जीवनात आनंद पेरणाऱ्या श्रमश्री बाबा आमटे या कर्मयोग्याने उभारलेल्या आनंदवनात सोमवारी एका अकल्पित घटनेने शोककळा पसरली. बाबा आमटे यांची नात व डाॅ. विकास व भारती आमटे यांची कन्या आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शीतल गौतम आमटे-करजगी (वय ३९) यांनी आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पुढे आले नसले तरी नैराश्येतून विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.  कौटुंबिक कलह आणि संस्थेतील वादामुळे डॉ. शीतल आमटे या गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होत्या, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. डॉ. शीतल यांनी संस्थेच्या कार्यात दिलेल्या योगदानाची दखल घेतानाच त्यांची मानसिक अवस्था ठीक नसल्याचे आमटे कुटुंबीयांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. प्राप्त

माहितीनुसार, सकाळी डाॅ. शीतल यांचे पती गौतम आपल्या आई-वडिलांना घेऊन वरोरा येथील एका खासगी रुग्णालयात गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांनी डाॅ. शीतल यांना आवाज दिला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दार उघडून घरात प्रवेश केला असता डाॅ. शीतल बेशुद्धावस्थेत पडलेल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच आनंदवनातील रुग्णवाहिकेने डाॅ. शीतल यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलविले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.  विषारी इंजेक्शनने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. हायप्रोफाईल केस असल्यामुळे चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेनंतर पोलीस अधीक्षक अरविंदे साळवे, वरोराचे उपविभागीय पोलीस अधीक्षक डाॅ. नीलेश पांडे व ठाणेदार दीपक खोब्रागडे यांनी पोलीस ताफ्यासह आनंदवनातील डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या निवासस्थानाची चौकशी केली. मात्र आत्महत्येबाबतचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. यानंतर चंद्रपूर येथील फाॅरेन्सिक लॅबच्या चमूने घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यांनाही काही गवसले नाही. सायंकाळी नागपूर येथील फाॅरेन्सिक लॅबच्या चमूला पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरूच होता. 

आनंदवनातील आनंद मावळला

डाॅ. शीतल आमटे यांचे पहिली ते १० वी पर्यंतचे शिक्षण वरोरा येथे झाले. ११ ते १२ वीचे शिक्षण आनंदनिकेतन महाविद्यालयातून पूर्ण केल्यानंतर नागपूर येथील शासकीय महावि‌द्यालयातून एमबीबीएस पदवी घेतली. कर्मयोगी बाबा आमटे यांचा वसा तिसऱ्या पिढीच्या रूपाने त्या चालवीत होत्या. पुणे येथील करजगी परिवारातील गौतम करजगी यांच्यासोबत विवाह झाला. त्यांना सहा वर्षाचा शर्वील नावाचा मुलगा आहे. २०१७ पासून डाॅ. शीतल महारोगी सेवा समिती आनंदवनच्या मुख्यकार्यकारी पदावर कार्यरत होत्या. त्यांचे पती गौतम करजगी आनंदवनात अंतर्गत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. आनंदवनात मुख्य व्यवसाय शेती असून यासोबतच दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, हातमाग सतरंज्या तयार करणे, कपाट तयार करणे, तीनचाकी सायकल तयार करणे, या वर्कशाॅपमध्ये साहित्य तयार केले जात. या सर्व बाबींवर डॉ. शीतल कार्य करीत होत्या. आनंदवनात कुष्ठरोगी, अंध, अपंग, निराधार व्यक्ती मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.कोरोना योद्धा म्हणून सत्कारडॉ. शीतल आमटे-करजगी यांनी प्रशासनाने कोरोना विषाणू विरोधात लढण्याकरिता समाजातील घटकांना कोरोना योद्धा म्हणून सामील होण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी कोरोना योद्धा म्हणून डॉ. शीतल आमटे यांनी सामील होऊन कार्य केले. या कार्याबाबत १५ ऑगस्ट रोजी पंचायत समिती वरोरा येथे  त्यांचा सत्कार करण्यात आला होता.बाबांच्या पायाजवळ अंतिम विसावा होणारकर्मयोगी बाबा व साधनाताईच्या समाजसेवेचा वसा पुढे नेत असताना वेळोवेळी बाबा व साधनाताईच्या स्मृतींना उजाळा देत होत्या. आनंदवनातील श्रद्धावनात कर्मयोगी बाबा व साधनाताई समाधीजवळ डॉ. शीतल आमटे अंतिम विसावा घेणार आहेत.

का उचलले टोकाचे पाऊल?डाॅ. शीतल आमटे-करजगी काही महिन्यांपासून नैराश्येत असल्याचे समजते. यातूनच त्यांनी टोकाची भूमिका घेतली असावी, असा अंदाजही व्यक्त होत आहे. आनंदवनात अस्थिरतेचे वातावरण असल्याचे सोशल मीडियावरून पुढे येत होते. डाॅ. शीतल यांची आई भारती आमटे, भाऊ काैस्तुभ व त्यांच्या पत्नी ही मंडळी आनंदवनातून बाहेर पडली होती. यानंतर त्यांचे वडील डाॅ. विकास आमटे हेही आनंदवनात वास्तव्यास नव्हते. ही सर्व मंडळी हेमलकसा येथे डाॅ. प्रकाश आमटे यांच्याकडे राहत.

एकट्या पडल्याने?डाॅ. शीतल यांनी सोशल मीडियावर महारोगी सेवा समितीवर आरोप केले होते. त्याचे आमटे कुटुंबीयांनी संयुक्त निवेदन करून खंडन केले. डाॅ. शीतल यांना मानसिक ताण असून त्या नैराश्येत असल्याचे नमूद केले होते. या घडामोडीतून डाॅ. शीतल एकांगी पडल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता आहे.

 

टॅग्स :Dr Sheetal Amteडॉ शीतल आमटेbaba amteबाबा आमटे