डॉ. मोहम्मद अशफाक, डॉ. युगेंद्र ठरले ‘टायगरमॅन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 16:14 IST2024-02-11T16:14:15+5:302024-02-11T16:14:39+5:30
आरोग्य सुरळीत ठेवण्याच्या अनुषंगाने माॅयल लिमिटेड कंपनीतर्फे मायॅल टायगरमॅन ट्रायथलॉन २०२४ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. मोहम्मद अशफाक, डॉ. युगेंद्र ठरले ‘टायगरमॅन’
चंद्रपूर : मॉयल लिमिटेड कंपनीतर्फे आयोजित मॉयल टायगरमॅन, ट्रायथलॉन २०२४ ही स्पर्धा नागपूर अंबाझरी येथे १० व ११ फेब्रुवारी रोजी पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये चंद्रपूर येथील जनरल फिजिशियन डॉ. मोहम्मद अशफाक व डॉ. युगेंद्र नागरकर यांनी सहभाग घेऊन स्पर्धेत यश पटकावत टायगरमॅनचा किताब पटकावला आहे.
आरोग्य सुरळीत ठेवण्याच्या अनुषंगाने माॅयल लिमिटेड कंपनीतर्फे मायॅल टायगरमॅन ट्रायथलॉन २०२४ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २० किलोमीटर सायकलिंग, ७५० मीटर स्विमिंग, पाच किलोमीटर रनिंग हे तीन इव्हेंट दोन तास ४० मिनिटांत पूर्ण करायचे होते.
चंद्रपुरातील जनरल फिजिशियन डॉ. मोहम्मद अशफाक व डॉ. युगेंद्र नागरकर यांनी यात सहभाग घेऊन हे तीनही इव्हेंट केवळ दोन तास १५ मिनिटांमध्ये पूर्ण करून टायगरमॅन बनण्याचा किताब पटकावला आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी त्यांनी दररोज तीन ते चार तास तिन्ही स्पर्धेचा सराव केला. त्यामुळेच त्यांना यश प्राप्त झाले आहे. डॉ. मोहम्मद अशफाक यांनी यापूर्वीहीसुद्धा अनेक मॅरेथॉन व सायकलिंग स्पर्धेत भाग घेऊन यश पटकावले आहे.