सुवर्णमध्य साधून प्रशासकीय कामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:27 AM2019-02-22T00:27:57+5:302019-02-22T00:29:42+5:30

ग्रामविकासाच्या क्षेत्रात काम करण्याची चांगली संधी सर्वांना मिळते. पण, सकारात्मक दृष्टिकोन बाळगून प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये सुवर्णमध्ये साधल्या विकासकामे गतीने होतात, असे प्रतिपादन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

Do administrative tasks by taking the gold medal | सुवर्णमध्य साधून प्रशासकीय कामे करा

सुवर्णमध्य साधून प्रशासकीय कामे करा

googlenewsNext
ठळक मुद्देजितेंद्र्र पापळकर : जिल्हा परिषद जनपद सभागृहात निरोप समांरभ

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ग्रामविकासाच्या क्षेत्रात काम करण्याची चांगली संधी सर्वांना मिळते. पण, सकारात्मक दृष्टिकोन बाळगून प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये सुवर्णमध्ये साधल्या विकासकामे गतीने होतात, असे प्रतिपादन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. अकोला येथे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याने जिल्हा परिषदने जनपद सभागृहात घेतलेल्या निरोप समारंभात ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रकांत वाघमारे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय पचारे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, दीपेंद्र पाटील, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक बोकाडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर पिपरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साठे, कृषी अधिकारी शंकर किरवे, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत बालदे आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
विभाग प्रमुखांनी मनोगत व्यक्त केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी पापळकर म्हणाले, अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे कार्य करावे. त्यांच्या सकारात्मक कामामुळे विकासाला दिशा मिळते. चंद्रपूर जिल्ह्यातील अनभुव प्रेरणा देणारे आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Web Title: Do administrative tasks by taking the gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.