शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

स्वच्छतेच्या दिशेने जिल्ह्याचे दमदार पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:04 IST

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध उपक्रम राबवून जिल्ह्याने देश पातळीवर उत्तुंग भरारी घेतली. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत एक लाख लोकसंख्येच्या गटातून मूल शहर देशात तिसरे तर सिटीझन फिडबॅक गटामध्ये चंद्रपूर महानगराने देशात २९ वा तर राज्यातून पहिला क्रमांक पटकाविला आहे.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण निकाल जाहीर : मूल देशातून तर चंद्रपूर महानगर राज्यातून तिसरे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध उपक्रम राबवून जिल्ह्याने देश पातळीवर उत्तुंग भरारी घेतली. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत एक लाख लोकसंख्येच्या गटातून मूल शहर देशात तिसरे तर सिटीझन फिडबॅक गटामध्ये चंद्रपूर महानगराने देशात २९ वा तर राज्यातून पहिला क्रमांक पटकाविला आहे.बुधवारी दिल्ली येथील विज्ञान भवनात पार पडलेल्या भव्य सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. मूल नगर परिषदने स्वच्छता अभियान दरम्यान अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवून लोकसहभाग वाढविला. केंद्र सरकारने दिलेल्या निकषांचे तंतोतत पालन करून दमदार कामगिरी केली. एक लाख लोकसंख्येतील नगर परिषदांसाठी घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता अ‍ॅपवरून तक्रारींचे निवारण आणि कचरामुक्त शहर असे वर्गीकरण करण्यात आले होते. प्रत्येक टप्प्याचे योग्य नियोजन करून वर्षभर यशस्वीरित्या मोहीम सुरू राबविण्यात आली. नगर परिषदने प्रभागनिहाय नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृतीपर नाविण्यपूर्ण सभा घेतल्या होत्या. स्वच्छता अ‍ॅपवर आलेल्या तक्रारींचे तत्काळ निवारण केल्या. शिवाय, नागरिकांच्या विधायक सुचनांची दखल घेऊन नवीन उपक्रमांवर भर दिला. शहराचा पाच हजार गुणांपैकी चार हजार २८ गुण मिळवून देशातून तिसरा पुरस्कार पटकाविला. नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, आरोग्य निरीक्षक अभय चेपुरवार आदींनी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.यशस्वी झाले ‘सिटीझन फीडबॅक’चंद्रपूर महानगरपालिकेला नागरिकांच्या प्रतिक्रीया म्हणजे ‘सिटीझन फीडबॅक’ या गटात देशातून २९ वा पुरस्कार मिळाला आहे. हा पूरस्कार राज्यातून तिसरा आहे. २ आॅक्टोबर २०१४ ते ३१ जानेवारी २०१९ पर्यंत हे अभियान राबविण्यात आले. चंद्रपूर महानगराने अनेक उपक्रम राबविले होते. यंदा सर्वेक्षणाची व्याप्ती वाढवून एक लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील चार हजार २३७ शहरांचे स्वच्छ सर्वेक्षण झाले. यामध्ये चंद्रपूर महानगराने भारतातून नागरिकांच्या प्रतिक्रीया या घटकात राज्यातून तिसरा आणि विदभार्तून पहिला क्रमांक पटकाविला आहे.मागील वर्षी स्वच्छतेत मागे पडलेल्या चंद्रपूर शहराने यंदा देशातून २९ वा पुरस्कार पटकाविला. स्वच्छता राखण्यात मनपा प्रशासन कुठेच कमी पडले नाही. नागरिकांच्या प्रतिक्रिया या घटकात गतवर्षी शहर मागे होते. ही कमरता यंदा भरून काढली. स्वच्छता ही नैतिक जबाबदारी समजून नागरिकांनी विविध प्रश्नांना प्रेरणादायी उत्तरे दिली. नागरिक, नगरसेवक व पदाधिकारी व प्रशासनाच्या सहकार्यामुळे चंद्रपूरला पुरस्कार मिळाले.- अंजली घोटेकर, महापौर चंद्रपूरमूल शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी नगर परिषदेने अत्यंत प्रामाणिकपणे कार्य केले. कालमर्यादा लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. शहरातील सर्व नागरिक व संघटनांनी मदत केले. त्यामुळे जनजागृती यशस्वी झाली. पुरस्काराने आत्मविश्वास वाढला. विविध सेवांचा दर्जा सुधारण्याला यापुढे प्राधान्य देणार आहोत. हा राष्ट्रीय पुरस्कार सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.- रत्नमाला भोयर, नगराध्यक्ष भोयर, मूल