जिल्हा ग्रामीण काँग्रेसचा कोरोना बाधितांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST2021-04-25T04:28:29+5:302021-04-25T04:28:29+5:30

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ...

District Rural Congress's helping hand to Corona victims | जिल्हा ग्रामीण काँग्रेसचा कोरोना बाधितांना मदतीचा हात

जिल्हा ग्रामीण काँग्रेसचा कोरोना बाधितांना मदतीचा हात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी गरजू रुग्णांना मदत कशी मिळेल याकरिता प्रशासनाच्या सहकार्याने तात्काळ रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणे, रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन व इतर अडचणीचे निराकरण करणे, रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासल्यास त्वरित रक्त पेढीतून रक्त उपलबध करून देणे, याकरिता मदत व मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे फिरते मदत केंद्र रुग्णांची आशेची किरण ठरत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता, नवीन काही रुग्णालयांना मान्यता देण्याकरिता काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांना विनंती केली असता त्यांनी चंद्रपूर ग्रामीणमध्ये वाढरी गावातील विमलादेवी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व इतर तीन रुग्णालयांना, कोविड रुग्णालय म्हणून मान्यता दिली आहे. रुग्णाला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: District Rural Congress's helping hand to Corona victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.