शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्ती योजना परत सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:28 IST

फोटो २२सीपीपीएच३४ (कॅप्शन : मार्गदर्शन करताना गृहमंत्री अनिल देशमुख) बल्लारपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित सुरू आहे. सरकार ...

फोटो २२सीपीपीएच३४ (कॅप्शन : मार्गदर्शन करताना गृहमंत्री अनिल देशमुख)

बल्लारपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित सुरू आहे. सरकार कधी पडेल याचे स्वप्न भाजपने चार वर्षांपर्यंत बघत रहावे, असा भाजपला टोला लगावत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारच्या भविष्यात काय लोकोपयोगी योजना आहेत, असे सांगत बंद पडलेली तंटामुक्त योजना परत सुरू करणार असल्याची घोषणा केली.

तसेच महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांचे प्रकरण एका महिन्याच्या आत निपटवून गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्याची तरतूद केली जात असून, त्याकरिता शक्ती कायदा तयार करण्याकरिता सर्वपक्षीय २१ आमदारांची एक समिती गठित केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

येथील बालाजी सभागृहात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. बाबासाहेब वासाडे, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेंभुर्डे, राकाँचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, दीपक जयस्वाल, शहर अध्यक्ष बादल उराडे, बेबीताई उईके, नितीन भटारकार, महादेव चिंचोलकर मंचावर उपस्थित होते.

अनिल देशमुख पुढे पोलीस भरतीबाबत माहिती देत म्हणाले, राज्यात साडेबारा हजार पोलीस भरती होणार असून, त्यातील पाच हजार पोलिसांच्या भरतीचे काम सुरू झाले आहे. राज्यातील तरुण-तरुणींसाठी नोकरीची ही फार मोठी संधी आहे. कोरोनाकाळात नोंदवलेले गुन्हे नोंदविले जाणार. काँग्रेस व राकाँची युती असूनही चंद्रपूर जिल्ह्यात आमदारांची तिकीट देताना राकाॅंला नेहमीच डावलले जाते, या घडीला तसे होणार नाही. जिल्ह्यातून युतीमधून राकाॅंकरिता दोन जागा नक्कीच घेऊ, असे आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. पक्षात प्रवेश करणाऱ्या तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या पक्षाच्या ग्रामपंचायत सदस्यांचा देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक राजेंद्र वैद्य यांनी केले, तर संचालन संजय वैद्य यांनी केले.

बॉक्स

भाजयुमोकडून देशमुख यांना काळे बॅनर दाखविले

शुक्रवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख बल्लारपूर येथे कार्यकर्ते मेळाव्यास जात असताना येथील भारतीय जनता युवा मोर्चातर्फे बसस्थानक परिसरात भाजयुमोचे जिल्हा युवा अध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी त्यांना काळे बॅनर दाखविले व सरकारच्या धोरणाचा निषेध केला.