मतदान केल्यास मिळणार सवलतीत औषध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 06:00 AM2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:00:56+5:30

चंद्रपुरातील सर्वच प्रतिष्ठानांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांची स्वीप उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत व्यावसायिकांची नुकतीच बैठक पार पडली.

Discounted drug will be available if voted | मतदान केल्यास मिळणार सवलतीत औषध

मतदान केल्यास मिळणार सवलतीत औषध

Next
ठळक मुद्देनिवडणूक प्रशासनाचा उपक्रम। मतदानाची वाढविणार टक्केवारी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करून बोटावरील शाई दाखवल्यास औषधांवर १० टक्के सवलत दिल्या जाणार आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने आवाहन केले होते. शहरातील श्री संत विजय मेडिकल स्टोअर्स व आरएक्स मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्सने प्रतिसाद दिला. हा नाविन्यपूर्ण उपक्रम २१ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.
चंद्रपुरातील सर्वच प्रतिष्ठानांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांची स्वीप उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत व्यावसायिकांची नुकतीच बैठक पार पडली. त्यांनी लोकशाही व्यवस्थेतील मतदानाचे महत्त्व उपस्थितांनी समजावून सांगितले. या बैठकीत दोन व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मतदान केलेल्या नागरिकांना औषधी खरेदीत सवलत देण्याचे श्री संत विजय मेडिकल स्टोअर्स व आरएक्स मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्सच्या संचालकांनी मान्य केले. श्री संत विजय मेडिकल स्टोअर्स एलआयसी बिल्डिंगजवळ आहे. मतदान केलेल्या नागरिकांना २१ ते २३ ऑक्टोबरपर्यंत औषधांच्या एकूण किमतीवर १० टक्के सूट देणार आहेत. गणेश दंतुलवार यांचे आरएक्स मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स महसूल भवनाजवळ आहे.
जे नागरिक २१ ऑक्टोबर रोजी मतदानाचा हक्क बजावतील त्यांना ३१ आॅक्टोबरपर्यंत सवलत मिळेल. मतदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे.

चंद्रपूर मतदारसंघात सर्वात कमी मतदान
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात शहरी मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, चिमूर या मतदारसंघाच्या तुलनेत कमी मतदान झाले होते. शिक्षणाचे प्रमाण अधिक असुनही मतदानाची टक्के का वाढत नाही, असा प्रश्न राज्य निवडणूक आयोगाला पडला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदार जागृती करण्यासाठी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाकडे जिल्हा निवडणूक प्रशासन विशेष लक्ष देत आहे. त्याचाच भाग म्हणून यंदा हा उपक्रम प्रथमच राबवण्यात आला आहे.

Web Title: Discounted drug will be available if voted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :medicineऔषधं