चंद्रपुरातील लंपटवृत्तीच्या मिनी आयटीआयच्या संचालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 10:47 AM2020-09-08T10:47:39+5:302020-09-08T10:48:05+5:30

एका तरूणीवर संचालकाने दहा हजार रुपये देतो, आपण शरीरसंबध प्रस्थापित करू, अशी मागणी केली व तिचा विनयंभंग केला. दुसऱ्या खोलीत असलेल्या तरूणीने आरडाओरड केल्यानंतर तिची कशीबशी सुटका झाली.

Director of Mini ITI arrested in Chandrapur | चंद्रपुरातील लंपटवृत्तीच्या मिनी आयटीआयच्या संचालकाला अटक

चंद्रपुरातील लंपटवृत्तीच्या मिनी आयटीआयच्या संचालकाला अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मिनी आयटीआयमध्ये शिवणकलेचे प्रमाणपत्र आणण्याकरिता गेलेल्या एका तरूणीवर संचालकाने दहा हजार रुपये देतो, आपण शरीरसंबध प्रस्थापित करू, अशी मागणी केली व तिचा विनयंभंग केला. दुसऱ्या खोलीत असलेल्या तरूणीने आरडाओरड केल्यानंतर तिची कशीबशी सुटका झाली. गोंडपिपरी येथे रविवारी दुपारी हा प्रकार घडला. या प्रकरणी मिनी आयटीआयच्या संचालकाविरोधात पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
गोंडपिपरी येथे एक खासगी मिनी आयटीआय आहे. कोेंढाणा येथील अमित अलोणे हा मिनीआयटीआय चालवितो. या माध्यमातून शिवणक्लास व इतर बाबींचे प्रशिक्षण दिले जाते.

करंजी येथील दोन तरूणींनी या मिनी आयटीयात शिवणक्लाससाठी प्रवेश घेतला. परीक्षाही झाली. रविवारी त्या डिप्लोमा घेण्याकरिता आयटीआयमध्ये गेल्या. दरम्यान संचालक अमित अलोणे याने एका तरूणीला दुसºया खोलीत मासिक पाळीबाबत सविस्तर लिहिण्यासाठी सांगितले. दुसरीच्या सोबत तो अंगलट करू लागला. त्याने तिला अश्लील चित्रही दाखविले. यांनतर तिचा विनयभंग केला. दहा हजार रुपये देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र तरूणीने नकार दिला व दुसºया खोलीत असलेल्या मैत्रिणीला आवाज दिला.

संधी साधून तिने आपली सुटका केली. तरुणीच्या पालकांनी गोंडपिपरी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अमित अलोणेविरूध्द पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

 

Web Title: Director of Mini ITI arrested in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.