ब्रम्हपुरी-आरमोरी मार्गावर धुळीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:26 IST2018-04-30T23:26:01+5:302018-04-30T23:26:01+5:30
ब्रम्हपुरी-आरमोरी या राज्य मार्गाचे राष्ट्रिय महामार्गात रूपांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात येत आहे. मात्र अतिशय संथगतीने काम सुरू असल्याने व रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकी व चारचाकी वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.

ब्रम्हपुरी-आरमोरी मार्गावर धुळीचे साम्राज्य
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : ब्रम्हपुरी-आरमोरी या राज्य मार्गाचे राष्ट्रिय महामार्गात रूपांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात येत आहे. मात्र अतिशय संथगतीने काम सुरू असल्याने व रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकी व चारचाकी वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.
कोणतेही काम करायचे झाल्यास गैरसोय होतेच. परंतु, त्यावर काही उपायोजना करून गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. मात्र या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात प्रयत्नांचा अभाव दिसून येत आहे. सुमारे २० किमी रस्ता खोदूून ठेवण्यात आला असून त्यावर मुरूम टाकण्यात आले आहे. या मुरमावरूनच वाहतूक सुरु आहे. जेव्हा मोठी वाहने धावतात, तेव्हा प्रचंड धूळ उडून समोरचे वाहन काही काळासाठी दिसेनासे होत असते. प्रसंगी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. रस्त्याचे खोदकाम करून मुरूम टाकण्यात आले असले तरी या कच्च्या रस्त्यावर पाणी मारले जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे.