शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्ध जीवन’ च्या ठेवीदारांची रक्कम परत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST

आनंदवन वरोरा येथे समृद्ध जीवनच्या ठेवीदार व अभिकर्त्यांद्वारा आयोजित बैठकीदरम्यान स्वीय सहाय्यक मिलींद राले यांनी फोनवरून संवाद साधला. चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, हिंगणघाट, वणी, मारेगाव इत्यादी जवळपासच्या तालुक्यातील ठेवीदार व अभिकर्ते यांच्यातर्फे आनंदवन वरोरा येथे बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. समृद्ध जीवनचे दिवाळे निघाल्यामुळे ठेविदारांना पैसे परत मिळणार की नाहीत, याबाबत साशंकता होती.

ठळक मुद्देप्रशासकांच्या स्वीय सहायकांच्या वक्तव्याने दिलासा

वतन लोणे/ रत्नाकर ठोंबरे ।लोकमत न्यूज नेटवर्कघोडपेठ : संपूर्ण महाराष्ट्रात लाखो गुंतवणूकदार असलेल्या समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज को. आॅप. सोसायटीच्या गुंतवणूकदारांना दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. या सोसायटीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची रक्कम लवकरच संबंधित व्यक्तींच्या खात्यात जमा करण्यात येईल, अशी ग्वाही प्रशासकांचे स्वीय सहाय्यक मिलींद राले यांनी दिली. त्यामुळे लाखो गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.आनंदवन वरोरा येथे समृद्ध जीवनच्या ठेवीदार व अभिकर्त्यांद्वारा आयोजित बैठकीदरम्यान स्वीय सहाय्यक मिलींद राले यांनी फोनवरून संवाद साधला. चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, हिंगणघाट, वणी, मारेगाव इत्यादी जवळपासच्या तालुक्यातील ठेवीदार व अभिकर्ते यांच्यातर्फे आनंदवन वरोरा येथे बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. समृद्ध जीवनचे दिवाळे निघाल्यामुळे ठेविदारांना पैसे परत मिळणार की नाहीत, याबाबत साशंकता होती. प्रशासक सतिश क्षीरसागर यांचे स्वीय सहायक मिलींद राले यांनी यावेळी ठेविदारांसोबत फोनवरून चर्चा करून दिलासा दिला.सोसायटीच्या ३७५ मालमत्ता जप्त केल्या असून सेबी व ईडीकडून विक्रीस मान्यता मिळण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत.लवकरच यासंदर्भात वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती स्वीय सहायक मिलींद राले यांनी दिली आहे. त्यानुसार ठेविदारांना कागदपत्रे आॅनलाइन पध्दतीने अपलोड करावे लागतील. ठेविदारांच्या कागदपत्रांची तपासणी करूनच संबंधितांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.तोपर्यंत ठेविदारांनी संयम राखण्याचे आवाहन स्वीय सहाय्यक मिलींद राले यांनी केले आहे.अनेक राज्यात केला विस्तारमुदत ठेव व आवर्त ठेवच्या माध्यमातून अनेकांनी समृध्द जीवनमध्ये पैसा गुंतविला. समृध्द जीवनने आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करून महाराष्ट्रासह उत्तराखंड, ओडिसा, पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगढ, दिल्ली, गोवा, गुजरात, कर्नाटक व मध्यप्रदेशात आपली कार्यालये स्थापन केली. मात्र, अल्पावधीतच कंपनीचे दिवाळे निघाल्याने लाखो ठेविदारांचे पैसे बुडाले. त्यातच कंपनीबद्दल कुठलीही माहिती ठेविदारांना माहीत होत नव्हती. मात्र, स्वीय सहाय्यकांनी दिलासा देत लवकरच पैसे परत मिळणार असल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :Investmentगुंतवणूक