शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

डायमंड कटींग प्रशिक्षणातून बेरोजगारीवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 6:00 AM

विदर्भातून मोठ्या प्रमाणात सुरत व मुंबई या परिसरातील डायमंड कटींग अर्थात हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगात तरुण काम करतात. मात्र त्यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षणाची गरज असते. हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगामध्ये कुशल मनुष्यबळाची प्रचंड मागणी आहे. किमान कौशल्य आवश्यकता असणाऱ्या या व्यवसायामध्ये हमखास २० ते ४० हजार रुपये प्रति महिना असा रोजगार मिळतो.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार म्हणतात, केंद्रामुळे हमखास नोकरीची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली या भागात रोजगार निर्मिती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक अभिनव प्रयोग करण्यात आला आहे. बल्लारपूर येथे डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. हमखास नोकरीची संधी असलेल्या या प्रशिक्षणातून बेरोजगारांना रोजगार मिळत आहे.विदर्भातून मोठ्या प्रमाणात सुरत व मुंबई या परिसरातील डायमंड कटींग अर्थात हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगात तरुण काम करतात. मात्र त्यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षणाची गरज असते. हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगामध्ये कुशल मनुष्यबळाची प्रचंड मागणी आहे. किमान कौशल्य आवश्यकता असणाऱ्या या व्यवसायामध्ये हमखास २० ते ४० हजार रुपये प्रति महिना असा रोजगार मिळतो. त्यामुळे ११ फेब्रुवारी २०१६ रोजी बल्लारपूर येथे डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली. या प्रशिक्षणातून दरवर्षी एक हजार तरुणांना सुरत, मुंबई आदी शहरांमध्ये नोकरी देण्याची हमी संबंधित कंपनीने घेतली आहे. आतापर्यंत युवकांच्या दोन तुकड्या येथून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या आहेत. यातील अनेकांना विविध शहरात रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय आनंदात आहे.प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लारपूर येथे डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी आपण पुढाकार घेतला आहे. अनेकांना येथून प्रशिक्षित झाल्यानंतर रोजगार मिळाला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता आहे. त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले तर ते भीम पराक्रम करू शकतात. हे या जिल्ह्यातील आदिवासी तरुणांनी एव्हरेस्ट सर करून दाखवून दिले आहे.- सुधीर मुनगंटीवार,अर्थ, नियोजन व वनेमंत्री, महाराष्ट्र शासन.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर येथे डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामुळे परिसरातील बेरोजगार तरुण कामाला लागले आहेत. चांगले प्रशिक्षण घेतले की हमखास नोकरी मिळते.-चंद्रकला बोबाटे, इटोली.चंद्रपूर जिल्ह्यात उद्योग असले तरी बेरोजगारीही वाढली आहे. ती कमी करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेले डायमंड कटींग सेंटर तरुणांसाठी फायदेशीर ठरत आहे. त्यांना यातून काम मिळत आहे.-हरीश गेडाम, बामणी (दुधोली).चंद्रपूरच्या एकलव्याची एव्हरेस्टवर स्वारीउपजत कलागुणांना संधी मिळाली की आकाश ठेंगणे होते, याचे उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी जगापुढे मांडले आहे. चंद्रपूर व महाराष्ट्राचा झेंडा चंद्रपूरच्या पाच विद्यार्र्थ्यानी एव्हरेस्टवर पोहचवला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास विभाग व जिल्हा प्रशासन यांनी राबवलेल्या मिशन शौर्य हा अभिनव उपक्रम यशस्वी केला. ज्यांनी आयुष्यात कधी विमान बघितले नाही. या मिशनसाठी जवळपास वर्षभराची तयारी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने केली होती. २०१८ च्या मे महिन्यात मुलांनी हा भीम पराक्रम केला. चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेतील सक्षम, काटक, सुदृढ ५० विद्यार्थ्यापैकी दहा विद्यार्थ्यांची निवड एक वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर करण्यात आली. दहापैकी कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, परमेश आडे, मनीषा धुर्वे व विकास सोयाम या पाच विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर केले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्षमता वृद्धीच्या या प्रयोगाला आता राज्यव्यापी अभियानाचे स्वरूप आले आहे. या मिशनमधून मिशन शक्तीचा उदय झाला आहे. क्रीडा, कला, उद्योग, प्रशासन क्षेत्रात आदिवासीबहुल जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व उमटावे यासाठीचा हा प्रयत्न राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नोंदवला गेला. प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात लाल किल्ल्यावरुन चंद्रपूरचा यासाठी गौरव केला.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी