शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नंदारा येथील अतिक्रमण काढण्याची मागणी

By admin | Updated: June 29, 2015 01:43 IST

चिमूर तालुक्यातील नंदारा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या मासळ तुकूम गावातील स्मशानभूमी व ढोरफोडीच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे.

१० जुलैपासून बेमुदत उपोषण : प्रशासनाला दिले निवेदन चिमूर: चिमूर तालुक्यातील नंदारा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या मासळ तुकूम गावातील स्मशानभूमी व ढोरफोडीच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत प्रशासनाशी पत्रव्यवहार करुनही कारवाई केली नाही. त्यामुळे तहसील कार्यालयासमोर १० जुलैपासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा माजी सरपंच सुनिल शेडामे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. मासळ तुकूम गावाची लोकसंख्या ६०० आहे. शासनाने स्मशानभूमीची जागा राखून ठेवली असताना येथील किसन कोसरे यांनी त्यावर अतिक्रमण केले होते. परंतु त्यावेळी नाल्याला पाणी असल्याने मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचण होती. एका महिलेच्या पार्थिवावर रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या घटनेनंतर तत्कालिन तहसीलदारांनी यांनी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत १४ जुलै २००७ रोजी सर्वे क्र. ११८ आराजी ०.२३ हे.आर. एवढी जमिनीची स्मशानभूमीसाठी मोजणी करुन ती जागा खुली करण्यात आली होती. परंतु येथील सरपंचाच्या सहकार्याने देवीदास कोसरे यांनी पोकलँड मशीनने स्वत:च्या शेतातील माती स्मशानभूमीत टाकून मोठी पाळ टाकली. नंदारा तुकूम रस्त्याच्या पुलाची पाईपलाईन व शिवधुराची पाईपलाईन बुजविल्याने रस्त्यावर पाणी साचून रस्त्याची दैनावस्था झाली आहे. गावातील कोही लोक मृत जनावरे मामा तलावात टाकत होते. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. सन २०१३ मध्ये तहसीलदार व ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. तसेच सहा दिवस उपोषण करुन सर्व्हे ५५ आराजी १.०१ या जागेवर अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले. या जागेवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश २४ डिसेंबर २०१३ काढण्यात आले. ११ आॅगस्ट २०१४ रोजी ग्रामपंचायतीने मोजणी करुन सीमांकन करुन पोल उभे केले. मात्र ग्रामपंचायतीच्या सीमांकनाला न जुमानता जर्नाधन शेडामे, पुंडलिक लोणारे त्या जागेवर अतिक्रमण करीत आहे. ३० मे रोजी याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार करुन माहिती दिली. परंतु ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. मासळ तुकूम गावातील शासकीय जागेवरील अतिक्रमण होत असून तत्काळ चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी १० जुलैपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती माजी सरपंच सुनील शेडामे यांनी दिली. यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनासुद्धा माहिती देण्यात आल्याचे माजी सरपंच सुनील शेडामे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)