शालू शिंदे यांच्या मृत्यूचे गूढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:41 IST2018-01-10T23:41:06+5:302018-01-10T23:41:47+5:30
येथील पंचायत समितीच्या सदस्य शालू शिंदे यांनी स्वत:च्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली होती.

शालू शिंदे यांच्या मृत्यूचे गूढ कायम
चंद्रपूर : येथील पंचायत समितीच्या सदस्य शालू शिंदे यांनी स्वत:च्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली होती. पोलिसांनी तपास सुरू केला मात्र गूढ कायम आहे. घुग्घुस येथील रहिवासी शालू विवेक शिंदे या पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. घुग्घुस येथे त्यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय होता. मंगळवारी सकाळी त्यांच्या घरी गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. तपासाकडे जनतेचे लक्ष लागले आहे.