कोळसा खाणीत बांध फुटला; चार वेकोलि कामगार थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:18 IST2026-03-13T13:17:35+5:302026-03-13T13:18:25+5:30

Chandrapur : वेळीच बचाव कार्यामुळे मोठा अनर्थ टळला, सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

Dam bursts in coal mine; four workers narrowly escape | कोळसा खाणीत बांध फुटला; चार वेकोलि कामगार थोडक्यात बचावले

Dam bursts in coal mine; four workers narrowly escape

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
तालुक्यातील दूर्गापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भटाळी खुल्या खाणीत कोळसा खनन सुरू असताना चिखल व पाण्याचा बांध अचानक फुटल्याने चार कामगार चिखलाखाली दबल्या गेले. मात्र खाण व्यवस्थापनाने तत्काळ बचावकार्य राबवून सर्व चारही कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी (दि. १२ मार्च) पहाटे सुमारे १.३० वाजताच्या सुमारास घडली.

या घटनेत आदित्य थेरे (अंडर मॅनेजर), अशोक गिरडे (फोरमन), मेकल मोगली कनकय्या (पी.सी. मशीन ऑपरेटर) आणि डिवरे (ओव्हरमन) हे चार कामगार चिखलाखाली दबले होते. त्यांना तातडीने बाहेर काढून चंद्रपूर येथील डॉ. कुबेर यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चौघांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉ. प्रसन्ना मद्दीवार यांनी 'लोकमत'ला दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, भटाळी खुल्या कोळसा खाणीत रात्रपाळीत कोळसा काढण्याचे काम सुरू होते. पी.सी. मशीनद्वारे खनन सुरू असताना वर साचलेला चिखल बाजूला करून त्याचा तात्पुरता बांध तयार करण्यात आला होता. याच परिसरात संबंधित चारही कामगार आपले कर्तव्य बजावत होते. दरम्यान, अचानक चिखलाचा बांध फुटल्याने चिखल आणि पाण्याचा जोरदार लोट त्यांच्या दिशेने आला. बचावाची संधी न मिळाल्याने चारही कामगार आणि पी.सी. मशीन चिखलाखाली दबली.

घटना घडताच परिसरात काम करणाऱ्या इतर कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही कामगारांनी तत्काळ खाण व्यवस्थापनाला माहिती दिली. त्यानंतर दुसरी पी.सी. मशीन मागवून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आणि दबलेल्या चारही कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती वेकोलिच्या 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, त्यांनी गुरुवारी दिवसभर घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. दरम्यान, या घटनेची अधिकृत माहिती दुर्गापूर पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झालेली नसल्याचे समजते.


 

Web Title : कोयला खदान में तटबंध टूटा: चार डब्ल्यूसीएल कर्मचारी बाल-बाल बचे

Web Summary : भटाली कोयला खदान में तटबंध ढहने से चार कर्मचारी फंस गए। खदान प्रबंधन ने उन्हें तुरंत बचाया। सभी कर्मचारी सुरक्षित और स्थिर हैं। जांच चल रही है।

Web Title : Coal mine embankment breach: Four WCL workers narrowly escape

Web Summary : Four workers were trapped after an embankment collapsed at Bhatali coal mine. Mine management rescued them promptly. All workers are safe and stable. An investigation is underway.