सिलिंडरच्या स्फोटात पीठगिरणीसह घर भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:00 AM2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:00:50+5:30

गावात अनेक घरे एकमेकांना लागून आहेत. काही लोकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पण आग एवढी भयंकर होती की आगीत काहीच वाचवता आले नाही. या आगीत नारायण पवार, अंकुश नारायण पवार, विष्णू नारायण पवार, धरमसिंग नारायण पवार आणि सवई चतरु पवार यांचे संयुक्त घर जळून खाक झाले. यात लाखोंचे नुकसान झाले आहे. गडचांदूरवरून अग्नीशमन पथकाला पाचारण करण्यात आले.

Cylinder explosion burns house with flour mill | सिलिंडरच्या स्फोटात पीठगिरणीसह घर भस्मसात

सिलिंडरच्या स्फोटात पीठगिरणीसह घर भस्मसात

Next
ठळक मुद्देगावकरी गेले गावशिवाबाहेर : दुचाकी, मालवाहू ऑटोही जळाला

लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : येथून सात किमी अंतरावरील कुंबेझरी येथील नारायण चतरु पवार यांच्या घरी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने त्या आगीत त्यांचे घर पुर्णत: जळून खाक झाले. डोळ्यादेखत संपूर्ण घराची राखरांगोळी झाली. आगीच्या डोंबातून घरातील सदस्य कसेबसे बाहेर निघाल्याने जीवितहानी टळली. ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
गावात अनेक घरे एकमेकांना लागून आहेत. काही लोकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पण आग एवढी भयंकर होती की आगीत काहीच वाचवता आले नाही. या आगीत नारायण पवार, अंकुश नारायण पवार, विष्णू नारायण पवार, धरमसिंग नारायण पवार आणि सवई चतरु पवार यांचे संयुक्त घर जळून खाक झाले. यात लाखोंचे नुकसान झाले आहे. गडचांदूरवरून अग्नीशमन पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र हे वाहन यायला बराच विलंब लागला. या आगीत आपलेही घर तर जळणार नाही ना म्हणून गावातील अनेकांनी आपले प्राण वाचवण्यासाठी आपली महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गावशिवाबाहेर पळ काढला. जेव्हा आग आटोक्यात आली, त्यावेळी नागरिक परत आले.

२३ लाखांचे नुकसान
बुधवारी सकाळी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावात जाऊन जळालेल्या घराचा पंचनामा केला. घरासह सामान असा एकूण २३ लाख ५९ हजार ८५० रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीत हिरोची नवीन दुचाकी, मालवाहतूक ऑटो, पीठगिरणी, टीव्ही, फ्रीज, कुलर, शेतीपयोगी बि- बियाणे, अवजारे, महत्त्वाचे कागदपत्र,किराणा सामान सर्व भस्मसात झाले.

Web Title: Cylinder explosion burns house with flour mill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग