शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आसोलामेंढा तलावावर वाढली पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:42 IST

निसर्गदत्त वनराईने समृद्ध व सांडव्यावरून वाहणाऱ्या धबधब्यामुळे मागील आठवड्यापासून आसोलामेंढा तलावावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. १०० वर्षापूर्वी इंग्रजांनी बांधलेल्या आसोलामेंढा तलावाचे नैसर्गिक सौंदर्य मनाला मोहित करणारे आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक सौंदर्यावर भाळले पर्यटक : शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन विकास करावा

उदय गडकरी।लोकमत न्यूज नेटवर्कसावली : निसर्गदत्त वनराईने समृद्ध व सांडव्यावरून वाहणाऱ्या धबधब्यामुळे मागील आठवड्यापासून आसोलामेंढा तलावावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे.१०० वर्षापूर्वी इंग्रजांनी बांधलेल्या आसोलामेंढा तलावाचे नैसर्गिक सौंदर्य मनाला मोहित करणारे आहे. पावसाळ्यात सांडव्यावरुन वाहणारे पाणी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते. जिल्ह्याच्या कानाकोपºयातूनच नव्हे तर अन्य जिल्ह्यातूनही येणाºया पर्यटकांची गर्दी वाढत आहे. तलाव परिसरातील सौंदर्य आणि वाहणारे पाणी मनाला आल्हाद देतो. १०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी येथील नैसर्गिक सौंदर्याचे महत्त्व जाणले होते. परंतु, स्वतंत्र भारतातील शासनाने या परिसराकडे कायम दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. जलसाठा आणि क्षेत्रफळाने जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव म्हणून ओळखला जातो. तलावाची सिंचन क्षमताही मोठी आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येत असल्याने तलावातील जलसाठा निरंतर कायम राहतो. अशा परिस्थितीत या परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा देवून सुविधा उपलब्ध केल्यास आकर्षणाचे स्थळ म्हणून विकसित होऊ शकते. शासनाच्या कोणत्याही सुविधा नसताना पर्यटकांची दिवसेंदिवस वाढणारी गर्दी हे आसोलामेंढा तलावाच्या निसर्ग सौंदर्याचेच प्रतीक आहे. जिल्ह्यातील अधिकृत पर्यटन स्थळाच्या तुलनेत आसोलामेंढाचे सौंदर्य व वेगळेपणा नजरेत भरतो. तलावाच्या परिसराला विकसित करण्यासाठी शासनाने दूरदृष्टी दाखवून आणि पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्यास रोजागराची संधी निर्माण होऊ शकतात. देश-विदेशतील पक्षांचे या तलावर होणारे स्थलांतरण अभ्यासाचा विषय आहे. परिसरातील हिरवीगार वनराई आणि त्यातील विविध प्रजाती, वन्यप्राणी हे सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकतात. जिल्ह्यातील एकाही तलावात चार प्रपातांची (सांडवे) निर्मिती करण्यात आली नाही. मात्र आसोलामेंढा तलावाच्या चार सांडव्यावरून वाहणारे पाणी पर्यटकांचे मन मोहीत करते. आसोलामेंढा तलावाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्रशासनाने एक पाऊल पुढे येवून परिसराचा विकास करावा. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राची व्याप्ती वाढेल, असा आशावाद पर्यटकांनी व्यक्त केला आहे.सिंचनाची व्याप्ती वाढू शकतेब्रिटिश काळातील आसोलामेंढा तलावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. पर्यटन स्थळाचा दर्जा देत असताना तलावाला बाधा होणार नाही, या दृष्टीने विकास आराखडा तयार करावा. शेतकऱ्यांसाठी हा तलाव उपयुक्तच आहे. पण शासनाने लक्ष दिल्यास सिंचन व्याप्ती पुन्हा वाढेल.

टॅग्स :Aasolamendha Damआसोलामेंढा धरण