चंद्रपूर जिल्ह्यात पुतण्यांनी केला काकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 14:50 IST2018-09-05T14:49:49+5:302018-09-05T14:50:12+5:30

चिमूर येथील मनसेचे शहर अध्यक्ष नितीन लोणारे यांचे वडील बाबुराव लोणारे यांच्यावर घरगुती जागेच्या वादावरून त्यांचे पुतणे कैलाश लोणारे व ओमप्रकाश लोणारे यांनी डोक्यावर व पायावर फावड्याने प्राणघातक हल्ला केला.

cousin attacked uncle in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात पुतण्यांनी केला काकावर प्राणघातक हल्ला

चंद्रपूर जिल्ह्यात पुतण्यांनी केला काकावर प्राणघातक हल्ला

ठळक मुद्देजागेच्या वादावरून हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: चिमूर येथील मनसेचे शहर अध्यक्ष नितीन लोणारे यांचे वडील बाबुराव लोणारे यांच्यावर घरगुती जागेच्या वादावरून त्यांचे पुतणे कैलाश लोणारे व ओमप्रकाश लोणारे यांनी डोक्यावर व पायावर फावड्याने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारीला संध्याकाळी ७.३० च्या दरम्यान गुरूदेव वार्डात घडली. आरोपी ओम प्रकाश लोणारेला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी कैलास लोणारे फरार आहे.
चिमूर येथील गुरुदेव वार्ड येथे लोणारे कुटूंबीय राहत असून बाबुराव लोणारे व तुकाराम लोणारे यांचे मागील अनेक वर्षांपासून घरगुती जागेचा वाद होता. ३ सप्टेंबर सोमवारला संध्याकाळी बाबुराव लोणारे हे आपल्या घरासमोर बसले असता कैलास लोणारे व ओमप्रकाश लोणारे यांनी अचानक फावड्याने त्यांना मारण्यास सुरवात केली. यात बाबुराव लोणारे यांला डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. डॉ अश्विन अगडे यांनी पुढील उपचारसाठी नागपूर रेफर करण्यात आले. पोलीसांनी भांदवी ३२५ (३४) अन्वये गुन्हा नोंदविला असून आरोपी ओमप्रकाश लोणारे याला अटक करण्यात आली आहे. दुसरा आरोपी कैलाश लोणारे फरार झाला आहे असून पोलीस तपास सुरू आहे. तपास चक्रे वेगाने फिरत असून ठाणेदार मडामे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गणेश इगोले हे तपास करीत असून दुसरा आरोपी कैलाश लोणारे फरार आहे.

Web Title: cousin attacked uncle in Chandrapur district