शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

तस्करीसाठी कापसाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:34 IST

जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, याच काळात अवैध दारूची वाहतूक करण्यासाठी तस्करांकडून विविध प्रकारचे शोध लावण्यात आल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देप्रयत्न फसला : पडोली पोलिसांची धाडसी कारवाई

आॅनलाईन लोकमतघोडपेठ : जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, याच काळात अवैध दारूची वाहतूक करण्यासाठी तस्करांकडून विविध प्रकारचे शोध लावण्यात आल्याचे समोर आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहनाने कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या लगबग सुरू आहे. मात्र याचा फायदा घेत कापसाच्या आड दारूतस्करीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पडोली पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. दारूतस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेली ही शक्कल पाहून पोलिसांसह अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.पडोली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आर. के. सिंगनजुडे शनिवारी रात्री गस्तीवर असताना गुप्त सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चंद्रपूर-नागपूर महामार्गावर सापळा रचून दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान, रात्री १०.३० वाजताच्या सुमारास नागपूरकडून चंद्रपूरकडे येणाऱ्या अशोक लेलॅन्ड कंपनीच्या पिकअप वाहनाला पोलिसांनी थांबविले. पिकअप वाहनाची (क्रमांक एमएच ३१ ईएन ०८६९) झडती घेतली असता कापसाची पीक आढळून आले. आणखी खोलात तपासणी केली असता कापसामध्ये ११५ खर्ड्यांच्या खोक्यात प्रत्येकी ९० मिलीच्या ११ हजार ५०० देशी दारूच्या बॉटल्स आढळून आल्या. संपूर्ण दारू, ५० किलो कापूस व दोन मोबाइल, असा ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आणि दारू तस्क़रीकरिता वापरलेले वाहन, असा एकूण १४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर प्रकरणाची पोलीस स्टेशन पडोली येथे नोंद करण्यात आली असून आरोपी विनोद तुकाराम आडे व मुन्ना आनंदराव कांबळे दोन्ही रा. वर्धा यांना अटक करण्यात आलेली आहे.