भद्रावतीतील विकास कामात भ्रष्टाचार

By Admin | Updated: September 8, 2014 01:10 IST2014-09-08T01:10:08+5:302014-09-08T01:10:08+5:30

नगरपालिकेतर्फे शहराच्या सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार होत असून या प्रकरणाची चौकशी करावी, ..

Corruption in Bhadravati development work | भद्रावतीतील विकास कामात भ्रष्टाचार

भद्रावतीतील विकास कामात भ्रष्टाचार

भद्रावती : नगरपालिकेतर्फे शहराच्या सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार होत असून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक नंदू पढाल आणि इतरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगरपालिका क्षेत्रात विविध योजनांद्वारे अनेक विकासात्मक कामे सुरू आहे. विकासाच्या माध्यमातून शहराचा विकास करायचा आहे. मात्र नगराध्यक्ष तथा मुख्याधिकाऱ्यांनी संगनमत करून भ्रष्टाचार सुरु केल्याचे निवेदनात म्हटले आहे. शहरात झालेले कामे निकृष्ठ दर्जाची असून नियमबाह्य होत आहे. ही कामे करताना इतर नगरसेवकांचे आक्षेप असतानासुद्धा नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी डॉ. विजय इंगोले संगनमत करुन निकृष्ठ दर्जांच्या कामाचेही देयके प्रदान करुन घेतात. १६ आॅगस्टला पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत विषयांवर चर्चा न करता आणि नगरसेवकांनी केलेल्या प्रश्नाला उत्तरे न देता जबरदस्तीने कामे मंजूर करण्यात आली आहे. असे निवेदनात म्हटले आहे. निवीदा न मागवीता व सभागृहाची मंजूरी न घेता काही विकास कामे करण्यात आली आहे. स्थानिक पेट्रोल पंप चौकातील बाळासाहेब प्रवेशद्वार ते नागमंदिर पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र सदर डांबरीकरण एक महिन्यात उखडल्यानंतरही त्याला नगर परिषदेची मंजुरी घेण्यात आली. या मंजुरीला नगर सेवकांनी विरोध दर्शविला असतानासुद्धा त्यावर चर्चा न करता स्वमर्जीने मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांनी ते काम मंजूर करवून घेतले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेवून दक्षता व गुणवत्ता नियंत्रक विभाग चंद्रपूर यांच्या मार्फत योग्य ती चौकशी करुन अहवाल सादर करण्यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. दोषिंवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक नंदू पढाल, नगरसेवक कारेकर, नगरसेवक गौरकार, माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश मालोदे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Corruption in Bhadravati development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.