शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांचा नगरविकासाला विरोध

By admin | Updated: April 11, 2016 01:05 IST

येथील नगरपालिकेने अनेक विकासात्मक कामे हाती घेण्यासाठी ७ एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते.

सदस्यात एकमत नाही : विशेष सभेत अनेक मुद्यांवर चर्चामूल : येथील नगरपालिकेने अनेक विकासात्मक कामे हाती घेण्यासाठी ७ एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. सभेची कार्यवाही सुरू झाल्यानंतर केवळ पथदिवे देखभाल व दुरूस्तीच्या कामाला मंजुरी प्रदान करण्यात आली. उर्वरित अनेक विकासात्मक कामांना येथील नगरसेवकांनी विरोध दर्शविला. त्यामुळे मूल शहराची काही दिवसातच दयनिय अवस्था बघायला मिळणार आहे.राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या गृहक्षेत्रातील मूल नगरपालिकेत अनेक विकासात्मक कामे खेचुन आणली, त्यामुळे मूल शहराचा विकास होताना दिसून येत आहे. मूल नगर पालिकेत भाजपाचीच सत्ता आहे परंतु एकमत नसल्यामुळे अनेकदा सभेची कार्यवाही करताना विरोधाचा सामना करावा लागतो. त्यातच मूल नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱयंना गडचांदूर नगरपालिकेचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना मूल नगर पालिकेला पाहिजे त्या प्रमाणात वेळ देत नसल्यामुळे न.प. च्या विकास कामांचे नियोजन करताना पदाधिकाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.मूल नगरपालिकेने ७ एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. मूल शहरातील साफसफाई व घंटागाडी किंवा टाटा एईसीने गोळा करणे, पथदिवे देखभाल व दुरूस्तीचे काम, बांधकाम विभागातील ई-निविदा मधील दर सभेच्या माहिती व मंजुरीकरीता सभेत ठेवण्यात आले होते परंतु बहुतांश नगरसेवकांनी केवळ पथदिवे देखभाल व दुरूस्तीच्या कामाला मंजुरी दिली. त्यामुळे मूलच्या जनतेनी निवडून आलेल्या नगरसेवकांना केवळ राजकारण करण्यासाठी निवडून दिले काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. १७ सदस्यीय मूल नगर पालिकेत भाजपाचे १३ नगरसेवक आहेत. काँग्रेसचे १, राकाँचे २ तर अपक्ष १ नगरसेवक आहे. मूल नगर पालिकेत भाजपाचीच सत्ता आहे. परंतु नगरसेवकाच्या अंतर्गत कलहामुळे विकासकामांना भाजपाचे नगरसेवक विरोध करीत असताना दिसून येत आहे. नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून नगरोत्थान, दलितोत्तर, नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत मूल शहरातील अंतर्गत रस्ते, नालीचे बांधकाम खड्डीकरणाचे काम करण्याबाबत ईनिविदा बोलाविली होती. सभेत सर्व ईनिविदेचे वाचन करण्यात आले. अनेक कंत्राटदारांनी अंदाजकीय दरापेक्षा कमी दराची निविदा टाकल्या होत्या. हेच कारण समोर करून काही नगरसेवकांनी कंत्राटदार कामाचा दर्जा देण्यास असमर्थ असतात. त्यामुळे अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराची निविदा नामंजूर केले आहे. नगर पालिकेने विकासात्मक कामे हाती घेतल्यानंतर कंत्राटदाराकडून बांधकाम अंदाजपत्रकानुसार करून घेण्याची जबाबदारी नगरसेवक व न.प. कर्मचाऱ्यांनी असते परंतु शहर विकासाच्या कामांना नगरसेवकच विरोध करताना दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)त्यांना शहरातील विकास कामे नको - रिना थेरकरना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून मूल शहराचा कायापालट होत आहे. मूल शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहे. परंतु आमच्या काही नगरसेवकांना विकास कामे केलेले आवडत नाही. त्यामुळे ते विरोध करीत असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष रिना थेरकर यांनी दिली. विकासाच्या मुद्यावर तरी सर्वांचे एकमत असायला हवे. त्यात राजकारण आणून विकासाला आडकाठी आणण्याचा हा प्रयत्न आहे. विकासाला विरोध केल्यास नागरिक त्यांना क्षमा करणार नाहीत.शहर विकासाला विरोध - प्रशांत समर्थशहराच्या विकासाचे मुद्दे उपस्थित करून विशेष सभा घेण्यात आली. त्या सभेला आमचेच नगरसेवक प्रत्येकच विषयाला विरोध केले. भाजपाचे नगरसेवक विरोधकांना साथ दिले. त्यांना शहराच्या विकासाशी काहीही देणेघेण्ो नाही. त्यामुळे त्यांनी शहर विकासाच्या विषयाला विरोध केला असे मत नगरपालिकेचे पाणी पुरवठा सभापती प्रशांत समर्थ यांनी व्यक्त केले.