शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
4
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
5
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
6
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
7
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
8
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
9
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
10
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
11
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
12
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
13
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
14
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
15
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?
16
परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?
17
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
18
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
19
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
20
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

‘श्री’च्या उत्सवासाठी मनपा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:39 AM

मूर्ती आणि सजावटींमध्ये 'पीओपी'चा वापर मोठया प्रमाणात होतो, मात्र, 'पीओपी' पुन्हा वापरता येत नसल्याने प्रदूषणाची शक्यता नाकारता येत नाही. 'पीओपी'चा वापर घरगुती सजावट, भव्य सेट्सची उभारणी आणि मूर्ती तयार करण्यासाठी होतो. 'पीओपी'च्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत.

ठळक मुद्देमूर्तिकार, मूर्ती विक्रेते व गणेश मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २ सप्टेबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनेही आपली तयारी पूर्ण केली आहे. शहरातील विसर्जन घाट, कृत्रिम तलाव, निर्माल्य कुंड, रस्त्यांची डागडुजी आदी कामे पूर्ण केली आहेत. दरम्यान, या उत्सवात जल व ध्वनी प्रदूषण होऊ नये, शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये, या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी मूर्तीकार, मूर्ती विक्रेते व गणेश मंडळांचे पदाधिकारी यांची एक बैठक घेत त्यांना मनपा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.याप्रसंगी गणेशोत्सवादरम्यान प्लास्टर आॅफ पॅरिस निर्मित मूर्ती संबंधाने उपाययोजना करणे, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, मंडप उभारणे, सजावट करणे, मूर्ती विसर्जनासंबंधी मार्गदर्शक तत्वांवर चर्चा करण्यात आली.मूर्ती आणि सजावटींमध्ये 'पीओपी'चा वापर मोठया प्रमाणात होतो, मात्र, 'पीओपी' पुन्हा वापरता येत नसल्याने प्रदूषणाची शक्यता नाकारता येत नाही. 'पीओपी'चा वापर घरगुती सजावट, भव्य सेट्सची उभारणी आणि मूर्ती तयार करण्यासाठी होतो. 'पीओपी'च्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे जलप्रदूषणात वाढ होऊन जलचर प्राण्यांसह वनस्पतींनाही धोका पोहोचतो. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी मनपा आयुक्त संजय काकडे यांनी केले. यावेळी महानगरपालिकेतील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करामागील वर्षीच्या आकडेवारीनुसार शहरातील ९० टक्क्यांपेक्षा ज्यास्त मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच झाले होते. यंदा १०० टक्के मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे, यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. पाच ते साडेपाच फुटापर्यंतची मूर्तीसुद्धा आता कृत्रिम तलावातच विसर्जित करण्यात येणार आहे. कृत्रिम तलावात दर १ ते २ तासांनी विरघळणारी माती बाहेर काढण्यात येते. त्यामुळे मोठया मूर्तींचे विसर्जन योग्यप्रकारे होण्यास अडचण निर्माण होत नाही. याकरिता कृत्रिम तलावांची उंची वाढविण्यात आलेली आहे. कृत्रिम तलाव वापरास प्रोत्साहन म्हणून मनपातर्फे नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात येते. मागील वर्षी १९ कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले होते. यावर्षी आवश्यकतेनुसार अधिक तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे.देखाव्यात प्लास्टिक, थर्माकॉल टाळावेमंडळांनी गणेश सजावट व देखावे तयार करताना प्लास्टिक व थर्माकॉलचा वापर टाळावा. गणेशोत्सव काळात प्लस्टिकचा कचरा तयार होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी. पर्यारवण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकानेच स्वीकारायला हवी. प्रत्येक घरातून याची दक्षता घेतली गेल्यास इको प्रेंडली गणेशोत्सव साजरा व्हायला मदत होईल.स्वस्त दरात वीज पुरवठागणेश मंडळांनी स्थापनेसाठी मनपाकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. शहरातील गणेश मंडळांनी विद्युत खांबावरून अनधिकृतरित्या वीज पुरवठा घेऊ नये. विद्युत जोडणीसाठी स्वस्त दरात तात्पुरते वीज कनेक्शन महावितरण कंपनीने उपलब्ध करून दिले जात आहे. गणेश मंडळांनी त्याचा लाभ घ्यावा.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019