Coronavirus: Four Corona suspects re-admitted to hospital in Chandrapur | Coronavirus: चंद्रपुरात पुन्हा चार कोरोना संशयित रुग्णालयात दाखल

Coronavirus: चंद्रपुरात पुन्हा चार कोरोना संशयित रुग्णालयात दाखल

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील हज यात्रेवरून परत आलेलं एक दाम्पत्य आपल्या 35 वर्षीय मुलासह रात्री येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले आहे. या तिघांनाही खोकला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी सांगितले. ही मंडळी 14 मार्च रोजी सकाळी नागपूर विमानतळावर पोहोचली होती.

मात्र आपली कुठलीही तपासणी न झाल्याने हे दाम्पत्य सिंदेवाही पोलिसात गेले. अखेर पोलिसांनी या दाम्पत्याला चंद्रपूरला उपचारासाठी रवाना केले. हे दाम्पत्य रात्रीपासून आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहे. या सोबतच चंद्रपुरातील वडगाव येथील एक संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाला आहे. ही व्यक्ती 8 मार्चला दुबईवरून चंद्रपुरात आली होती. त्यालाही ताप व खोकला असल्याने भरती केले आहे. या चारही संशयित रुग्णाच्या रक्ताच्या तपासण्या केल्या जात आहे.

Web Title: Coronavirus: Four Corona suspects re-admitted to hospital in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.