शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीमुळे शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:38 IST

हरिभाऊ पाथोडे : संकटकाळात अंधश्रद्धा पसरवू नका सिंदेवाही : कोरोनाची लस घेतल्यानंतर आपल्या शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण ...

हरिभाऊ पाथोडे : संकटकाळात अंधश्रद्धा पसरवू नका

सिंदेवाही : कोरोनाची लस घेतल्यानंतर आपल्या शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण झाली, असा दावा करणारी बुवाबाजी सध्या सगळीकडे धुमाकूळ घालते आहे. शरीराला स्टीलचे चमचे, वाट्या, ताटे चिकटतात, असा त्यांचा दावा फोल असून कोरोना संकटकाळात अशा अंधश्रद्धा पसरू नका, असे आवाहन अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केले.

कोरोना लस ही कोरोनावर आळा घालण्यासाठी प्रभावी आहे. त्यामुळे शरीरात चुंबकीय शक्ती वगैरे निर्माण होत नाही. आपल्या शरीरातून घाम येतो आणि तो त्वचेवर साचतो. या घामामध्ये ‘सिबम’ हा चिकट द्राव असतो. हा सिबम चिकट असतो आणि त्वचेवर चिकचिकपणा निर्माण करतो. त्यामुळे केवळ धातूंच्याच नव्हे तर प्लास्टिकच्या वस्तूदेखील त्याला चिकटतात. ज्या व्यक्तींच्या त्वचेवर हा सिबम पसरलेला असतो. तेथे या वस्तू चिकटतात. हा सिबम जर तिथून काढून टाकला तर वस्तू चिकटायच्या थांबतात. ज्यांचे त्वचेवर केस नाहीत अशांना या सिबम चिकट द्रवाचा खूप मोठा फायदा होतो आणि वस्तू पटकन चिकटतात. तुमच्या आसपास जर असे कोणी चमत्काराचा दावा करून दाखवू लागले तर तुम्ही त्याच्या अंगाला पावडर फासा आणि वस्तू चिकटवून दाखव, असे सांगा तसेच शरीरात चुंबकीय क्षेत्र असेल तर हाताच्या बोटाने खाली पडलेला चमचा स्पर्श करून उचलून दाखवायला सांगा. अशा प्रकारे त्याचा भांडाफोड कोणीही करू शकेल आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे षङ्‌यंत्र थांबवता येईल, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केले आहे.

===Photopath===

140621\img-20210614-wa0025.jpg

===Caption===

कोरोना लसीमुळे शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण होत नाही! - हरिभाऊ पाथोडे