Corona patients increase by 1010, death toll continues | कोरोना रुग्णांची १०१० ने वाढ, मृत्यूचा कहर सुरूच

कोरोना रुग्णांची १०१० ने वाढ, मृत्यूचा कहर सुरूच

जिल्ह्यात मागील २४ तासात ३३५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ३५ हजार ५१३ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २८ हजार ४४८ झाली आहे. सध्या ६५४९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३ लाख ८ हजार ८६८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २ लाख ६७ हजार ७२७ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

बॉक्स

असे झाले मृत्यू

मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहराच्या छत्रपती नगर तुकुम येथील ५६ वर्षीय महिला, घुटकाला वाॅर्ड येथील ६५ वर्षीय महिला, ऊर्जानगर येथील ७५ वर्षीय पुरुष, दादमहल वाॅर्ड येथील ७० वर्षीय पुरुष व पाण्याच्या टाकीजवळ राम नगर येथील ४८ वर्षीय पुरुष, कोरिनाल तालुका चिमूर येथील ५६ वर्षीय पुरुष, चिमूर शहरातील ६५ वर्षीय पुरुष, राजुरा येथील ५३ वर्षीय पुरुष, राजोली ता. मूल येथील ७२ वर्षीय पुरुष, वणी यवतमाळ येथील ६९ वर्षीय पुरुष, राणी लक्ष्मी वाॅर्ड बल्लारपूर येथील ६० वर्षीय महिला, मूल येथील ७५ वर्षीय पुरुष, लोधिखेडा, वरोरा येथील ७० वर्षीय महिला, चिमूर येथील ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५१६ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ४७१, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २०, यवतमाळ २०, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

बॉक्स

तालुकानिहाय बधितांची संख्या

आज बाधित आलेल्या १०१० रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील ३६२, चंद्रपूर तालुका ११२, बल्लारपूर ११०, भद्रावती ३२, ब्रम्हपुरी ८१, नागभीड ३८, सिंदेवाही २९, मूल २३, सावली २९, पोंभूर्णा चार, गोंडपिपरी १२, राजुरा ५४, चिमूर ५४, वरोरा ३९, कोरपना १० व इतर ठिकाणच्या २१ रुग्णांचा समावेश आहे.

बॉक्स

कोरोना संपला नाही - जिल्हाधिकारी

नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रींचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

बॉक्स

सात दिवसात ७४ कोरोना बळी

कोरोना रुग्णांसह बळींची संख्याही धडकी भरविणारी आहे. गेल्या सात दिवसात कोरोनाने तब्बल ७४ जणांचा बळी घेतला आहे.

७ एप्रिल ०५

८ एप्रिल ०९

९ एप्रिल ०९

१० एप्रिल १६

११ एप्रिल ११

१२ एप्रिल १०

१३ एप्रिल १४

Web Title: Corona patients increase by 1010, death toll continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.