शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर क्रांती जिल्ह्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडवत दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करीत आहे. रस्ते आणि ग्रामपंचायतीसाठी भरपूर निधी शासनाकडून मिळवून दिला आहे. ५२ हजार कोटींची तरतूद फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी केली आहे, चिमूर क्रांती जिल्ह्यासाठी आपण अविरत संघर्ष करीत राहणार, अशी माहिती आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी दिली.

ठळक मुद्देकीर्तीकुमार भांगडिया : खडसंगी येथे कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : मागील पाच वर्षात चिमूर विधानसभा क्षेत्रात सर्वच स्तरावरून विकासाची कामे सुरू आहे. नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडवत दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करीत आहे. रस्ते आणि ग्रामपंचायतीसाठी भरपूर निधी शासनाकडून मिळवून दिला आहे. ५२ हजार कोटींची तरतूद फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी केली आहे, चिमूर क्रांती जिल्ह्यासाठी आपण अविरत संघर्ष करीत राहणार, अशी माहिती आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी दिली.खडसंगी-मूरपार जि.प. क्षेत्रात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला नीलम राचलवार, बकाराम मालोदे, डॉ. श्याम हटवादे, राजू देवतळे, दिगांबर खलोरे, जि.प. सदस्य रेखा कोरेकर, पं.स. सदस्य पुंडलिक मते, पं.स. सदस्य अजहर शेख, जेष्ठ नेते दिलीप पाटील कारेकर, गुलाब फरकाडे, दिलीप पाटील नलोडे, एकनाथ थुटे, गीता लिंगायत, छाया कनचलवार, माया नन्नावरे, पायल कापसे, रत्नमाला मेश्राम, भारती गोडे, सरपंच यशोदा तराळे, सरपंच ममता गायकवाड, मधुकर बन्सोड, बबलू पाटील थुटे, बाबाराव नन्नावरे, नामदेव हिवरकर, शामराव ननावरे, खेमराज इसनकर, विजय पाटील झाडे, हंसराज श्रीरामे, अशोक कामडी, रमेश कनचलवार, अफरोज पठाणआदी उपस्थित होते.आ. भांगडिया म्हणाले, चिमूर क्रांती जिल्हा व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहे. पाच वर्षांपासून क्षेत्रात अनेक विकासकामे झाली आहेत. राज्यात नवीन जिल्हे होतील तेव्हा त्यात चिमूरचे नाव निश्चितच असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जि.प. क्षेत्र प्रमुख विनोद चोखरे, पवन निखाडे, एकनाथ धोटे, ज्ञानेश्वर मेश्राम, विलास घाडगे, संजय खाटीक, मंगेश भुसारी, मनिष नाईक यांनी परिश्रम घेतले. यावेळी शेकडो युवकांनी व महिलांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. संचालन विवेक कापसे तर प्रास्ताविक अजहर शेख यांनी केले.