तळोधीत आठ पेट्या विदेशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:22 IST2019-07-15T00:21:32+5:302019-07-15T00:22:04+5:30

तळोधी (बा.) पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी करून पोलिसांनी आठ पेट्या विदेशी दारू जप्त केली. यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून दोन लाख ८१ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

Consumed eight cottage foreign liquor seized | तळोधीत आठ पेट्या विदेशी दारू जप्त

तळोधीत आठ पेट्या विदेशी दारू जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी (बा.): तळोधी (बा.) पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी करून पोलिसांनी आठ पेट्या विदेशी दारू जप्त केली. यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून दोन लाख ८१ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
तळोधी मार्गाने अवैध दारूची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरु केली. दरम्यान, रस्त्यावर पोलीस बघताच एमएच ३१ सीएन १३९१ च्या चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र चारही बाजून पोलिसांनी नाकाबंदी केल्यामुळे त्याला पळून जाणे शक्य झाले नाही. दरम्यान पोलिसांनी वाहनचालक मयुर संजय मानकर (२३) नागपूर याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून आठ विदेशी दारुच्या पेट्या हस्तगत केल्या असून वाहनासहीत दोन लाख ८१ हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. सदर कारवाई तळोधी (बा.) पी. एस. आय. आकाश साखरे यांच्या नेतृत्वात एस. सी. सोनटक्के, एस.सी. चनेकर, नेवारे, धुडसे, संजय मांढरे आदींनी केली. या कारवाईमुळे दारु तस्करांचे धाबे दणाणले असून काही प्रमाणात का, होईना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गावातीलही दारू तस्करांच्या मुस्क्या आवळाव्या, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Consumed eight cottage foreign liquor seized