शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर महापालिकेसाठी काँग्रेसचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला, उद्धवसेनेच्या पदरात काय? वडेट्टीवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:16 IST

चंद्रपूर महापालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसमध्ये वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर या संघर्ष उफाळून आला. हा वाद थेट दिल्लीपर्यंत गेला. दिल्लीत त्यावर तोडगा काढण्यात आला. 

चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसची डोकेदुखी प्रचंड वाढली. आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर असे गट पडल्याने संघर्ष टोकाला गेला. दोन्ही नेत्यांना थेट दिल्लीतून बोलावणे आले. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर दोन्ही गटातील सत्तेचे वाटप ठरले, पण पाठिंबा देण्यासाठी उद्धवसेनेला काय दिले जाणार, याबद्दल प्रश्न कायम होता. त्यावर आता विजय वडेट्टीवार यांनी खुलासा केला. 

विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतून जो निर्णय घेतला, तो म्हणजे गटनेता राजेश अरुण आणि प्रतिभा धानोरकर म्हणतील तो महापौर. त्यामुळे आमच्याकडून कोणीही महापौर पदाचा अर्ज भरला नाही. प्रतिभा धानोरकरांकडून चार महिलांनी अर्ज भरला आहे. उपमहापौर पदासाठी वसंतराव देशमुख यांनी अर्ज भरला आहे." 

आता काँग्रेसमध्ये वादाची परिस्थिती नाही

"आज आमच्या पक्षश्रेष्ठीच्या निर्णयानुसार राजेश अरुण यांची गटनेते पदी निवड झाली आहे. तसे प्रदेश काँग्रेस समितीने विभागीय आयुक्तांना पाठवले आहे. २७ नगरसेवक गट तयार करण्यासाठी आयुक्तालयात उपस्थित राहतील. पक्षश्रेष्ठींनी असा निर्णय घेतला असल्यामुळे आता कुठलीही संभ्रमाची किंवा वादाची परिस्थिती नाही", असा खुलासा विजय वडेट्टीवार यांनी केला. 

उद्धवसेनेने महापौरपदासाठी भरला अर्ज

उद्धवसेनेकडूनही महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, "हे अर्ज भरलेले आहेत. दहा तारखेला निवडणूक आहे. त्यामुळे घाई करून उपयोग नाही. त्यांनी अर्ज भरले ही सत्य परिस्थिती आहे. परंतू जनसेवक पार्टी काँग्रेससोबत आहे. ते काँग्रेसला पाठिंबा देतील." 

"उद्धवसेनेनेही अर्ज भरला आहे. त्यांच्यासोबत वाटाघाटी करून, त्यावर सुद्धा मार्ग काढता येईल. त्यामध्ये मला अडचण वाटत नाही. त्यांच्याबरोबर चर्चा आम्ही करत आहोत. त्यामुळे यात अडचण येईल अशी परिस्थिती नाही. उद्धवसेनेसमोरही पर्याय ठेवलेला आहे. त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देता येईल. सत्तेचे वाटप बरोबर होईल", अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

काही दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी महापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्ष अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याचबरोबर काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवाराचे नाव उद्धवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी चर्चा करून ठरवण्यात यावे, असेही म्हटले होते. मात्र, आता काँग्रेसकडून फक्त स्थायी समिती अध्यक्ष पदावरच बोळवण केली जाणार असे दिसत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress settles Chandrapur corporation power formula; What's in store for Uddhav Sena?

Web Summary : Congress resolved internal disputes over Chandrapur corporation leadership. While Congress gets the Mayor post, Uddhav Sena is offered the Standing Committee chairmanship. Discussions are ongoing to finalize the power-sharing arrangement.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार