शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मूल कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व

By admin | Updated: April 12, 2016 03:33 IST

राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाला धक्का देत

मूल : राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाला धक्का देत काँग्रेसने आपले वर्चस्व निर्माण केले. १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे १३ उमेदवार निवडून आलेत. भाजपाला ०३ जागेवरच समाधान मानावे लागले आहे. दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या १३ विजयी उमेदवारात सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून संजय मारकवार, राकेश रत्नावार, घनश्याम येनुरकर, धनंजय चिंतावार, किशोर धडसे, राजेंद्र कन्नमवार, शांताराम कामडे, महिला राखीव गटातून मुक्ताबाई मडावी, बैनाबाई वाढई, इतर मागास प्रवर्गातून पद्माकर लेनगुरे, विजा,भज, विमुक्त गटातून संदीप कारमवार, ग्रामपंचायत मतदार संघातून अखिल गांगरेड्डीवार, प्रशांत बांबोळे आदींनी बाजी मारली. भाजपाच्या विजयी उमेदवारांत ग्रामपंचायत गटातून वैजयंती मारगोनवार, व्यापारी अडते गटातून रमेश गोयल, ग्रामपंचायत मतदार संघातून विवेक बुरांडे यांनी बाजी मारली, तर अपक्ष उमेदवार मारोती चिताडे हे व्यापारी अडते गटातून निवडून आले. हमाल-मापारी गटातून रमेश बरडे यांनी बाजी मारली. काँग्रेसला कृषी उत्पन्न बाजार समितीत स्पष्ट बहुमत मिळाल्याने ठरल्याप्रमाणे काँग्रेसचे मूल तालुकाध्यक्ष तथा नवनिर्वाचित संचालक घनश्याम येनुरकर यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. बाजार समितीची निवडणूक एकप्रकारे तालुक्याची निवडणूक असल्याने भाजपाचे वर्चस्व असलेल्या मतदार संघात नामुष्की पत्करण्याची वेळ आली असल्याचे दिसुन येते. भविष्यात होणाऱ्या नगर परिषद व पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीला एकप्रकारे धोक्याची घंटाच असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)