कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत रंग उत्सवाचे रूप गणेशाचे

By Admin | Updated: September 11, 2016 00:44 IST2016-09-11T00:44:39+5:302016-09-11T00:44:39+5:30

विघ्नहर्ता गणेशाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले आहे. बुद्धीदेवता संकटहारी श्री गणेश म्हणजे चैतन्याची सुरुवात. प्रसन्न वातावरण ढोल ताशांचा गजर. ....

Colors and Lokmat Sakhi stage presented color festive form Ganesha | कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत रंग उत्सवाचे रूप गणेशाचे

कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत रंग उत्सवाचे रूप गणेशाचे

रचनात्मक व कलेच्या माध्यमातून गणरायाचे स्वागत :
विविध स्पर्धांतून साजरा करू या श्री गणेश उत्सव
चंद्रपूर : विघ्नहर्ता गणेशाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले आहे. बुद्धीदेवता संकटहारी श्री गणेश म्हणजे चैतन्याची सुरुवात. प्रसन्न वातावरण ढोल ताशांचा गजर. आरती अभंग मंत्रोच्चारणाचे पवित्र मंगलमय स्वर, विविध फुलांची सुवासिक दरवळ प्रसादाचा गोड सुवास, सर्वकाही चैतन्यमय, शाश्वत, देखणा, डोळे दिपवणारा हा उत्सव म्हणजे चराचरातून चेतना जागविणारा आकंठ चिरस्मरणीय असा हा सोहळा.
हा सोहळा कलर्स आणि लोकमत सखी मंच प्रस्तुत रंग उत्सवाचे रूप गणेशाचे या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा येथे साजरा होत आहे. या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रम १३.९.१६ रोजी श्यामाप्रसाद मुखर्जी हॉल, चंद्रपूर येथे दु. २ वा. होणार आहे. यात गणपतीला आवडणारे खाद्य म्हणजे मोदक स्पर्धा आणि म्हणूनच या सोहळ्यात पहीली स्पर्धा म्हणचे मोदक स्पर्धा (यात मोदक घरून तयार करून आणायचे आहे) दुसरी स्पर्धा म्हणजे गणेश - रेखाटन स्पर्धा - यात (धान्य, पाने, फुले, पूजेचे साहित्य इत्यादी वापरून) गणेश रेखाटन करायचे आहे. तिसरी स्पर्धा म्हणजे पुष्पहार स्पर्धा यात (फुले , सुई-दोरा साहित्य घरून आणायचे आहे) ठराविक वेळेत हार तयार करायचा आहे. खरे सांगायचे तर भक्तीचे अनेक रंग या स्पर्धांद्वारे कर्लस आणि लोकमत सखीमंच घेवून येत आहे. गेल्या वर्षभर कलर्स चॅनेलने सखींसाठी विविध उपक्रम राबविले आणि ते संपूर्ण स्तरावर पसंतदेखील केले गेले. कलर्स चॅनेल म्हणजे भारतातील सर्वश्रेष्ठ लोकप्रिय प्रिमियम हिंदी जनरल एंटरटेनमेंट चॅनल आहे. भारतीय इतिहासात पहिल्यांदा असे कार्यक्रम कलर्सने आणले आहे. जे वेगळे आहेत आणि मनाला भावणारे आहेत. प्रत्येक मालिकांचे कथानक असे होते ज्यांच्यामध्ये ताकत होती, जुन्या बुरसटलेल्या रूढी परंपरेविरुद्ध जाब विचारण्याची, फिक्शन शो पासून तर फॉरमॅट शो, रिअ‍ॅलिटी शोपासून तर ब्लॉक बास्टर चित्रपट - सदैव विविध शो आणि कार्यक्रमांनी भरलेला भरगच्च नजराणा प्रेक्षकांसाठी कायम हजर.
कलर्सचे नागिन २, शनी, दिव्यांशी आणि बिग बॉस हे आगामी आकर्षण आहे. तेव्हा मनोरंजनाची धमाल करण्यासाठी तयार रहा आणि या उत्सवात सामील व्हा.
या प्रसंगी उपस्थित सखीसाठी एक मिनिट गेम शो आणि पैठणी जिंकण्याची संधी. या कार्यक्रमा दरम्यान मिळणार आहे. विजेत्या सखीना कलर्स तर्फे आकर्षक पुरस्कार देण्यात येतील. कार्यक्रम व स्पर्धा सर्वांसाठी नि:शुल्क आणि खुली. अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क लोकमत कार्यालय, २ रा माळा, धनराज प्लाजा, लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या बाजूला मेन रोड, चंद्रपूर, पूजा ठाकरे ९०११३२२६७४, अमोल कडुकर ९२७०१३१५८० (प्रतिनिधी)

Web Title: Colors and Lokmat Sakhi stage presented color festive form Ganesha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.