शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोलाम जातीच्या प्रमाणपत्रापासून वंचित

By admin | Updated: December 24, 2014 22:58 IST

राजुरा तालुक्यातील कोस्टाळा ग्रामपंचायत अंतर्गत घोट्टा येथील कोलामांनी जातीच्या प्रमाणपत्रासाठी राजुरा तहसील कार्यालयात कागदपत्रासह ६ जानेवारी २०१४ ला अर्ज दाखल केला.

राजुरा : राजुरा तालुक्यातील कोस्टाळा ग्रामपंचायत अंतर्गत घोट्टा येथील कोलामांनी जातीच्या प्रमाणपत्रासाठी राजुरा तहसील कार्यालयात कागदपत्रासह ६ जानेवारी २०१४ ला अर्ज दाखल केला. परंतु अद्याप त्यांना कोणतीही सूचना संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली नाही. त्यामुळे गोरगरीब अशिक्षित कोलामांची पायपीट एक वर्षांपासून सतत सुरू आहे. घोट्टा येथील आदिवासी कोलाम सुमारे ४० वर्षांपासून वास्तव्य करीत आहे. त्यांच्याकडे सन १९५० च्याव वास्तव्याचा कोणताही पुरावा नाही. कोलामांचे पूर्वज राजुरा तालुक्यातील माणिकगड पहाडावरील नाल्याकिनाऱ्या दुर्गम जंगल भागात राहून वास्तव्य करीत होते. त्यांचे वास्तव्य अस्थिर होते. वास्तव्याठिकाणी कोलामगुड्यावर एखाद्याचा मृत्यू झाल्यास वास्तव्याची जागा सोडून दुसरीकडे वास्तव्य करणे ही त्याची पद्धत आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे स्थिर वास्तव्याचे पुरावे नाहीत. सध्या घोट्टा येथे ४० वर्षांपासून शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण करून जीवन जगत आहे. कोलाम अशिक्षित असल्यामुळे त्यांच्यापैकी कुणीही शासकीय नव्हता. शेती व बांबुपासून तट्टे बनवून त्यावर आपल्या कुटुंबाची उपजीविका करणे हे त्यांचे काम होते. आम जनतेच्या सान्निध्यात राहण्याची त्यांना सवय नाही. त्यांची राहण्याची वेगळी पद्धत आहे. त्याची भाषा, राहणीमान, नाव, खाणेपिणे, पोषाक आदी सर्वसामान्य नागरिकांपैक्षा वेगळे आहे.सध्या कोलामांना सर्वसामान्य नागरिकांकडे पाहून आपली मुलंबाळं शिक्षित झाले पाहिजे, आपणही शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, असे वाटत आहे. यासाठी त्यांनी धडपड सुरू केली आहे. परंतु त्यांची धडपड जातीच्या प्रमाणपत्राअभावी संपुष्टात आली आहे. राजुरा तहसील कार्यालयात ६ जानेवारी २०१४ ला जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करूनसुद्धा त्यांना काहीच कळविण्यात आले नाही. त्यांच्या अर्जाची फाईलसुद्धा गायब झालेली आहे. अधिकारीसुद्धा त्यांना भेटू देत नाही. यामुळे कोलाम समाजबांधव हताश झाले आहेत. त्यामुळे शासनाने या समाजाकडे लक्ष द्यावे. (तालुका प्रतिनिधी)