शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

कोळसा वाहतुकीने घेतला दोघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 05:00 IST

ही घटना शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रॅक्टर चालक मनोज शंकर राॅय व मजूर रुपेश बारसागडे यांचा जागीच मृत्यू झाला तर सुनील हा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर घुग्घुस येथील संतप्त नागरिकांनी घटनास्थळ गाठल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. मृतकाला ५० लाखांची आर्थिक मदत मिळावी, यासाठी जमावाने दोन्ही बाजूच्या मार्गांवरील वाहतुक रोखून धरली. रात्री उशिरापर्यंत तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच होते.

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस  : पैनगंगा ते घुग्घूस दरम्यान बैरमबाबा मंदिर परिसरात नव्या तयार करण्यात आलेल्या वळण मार्गावर कोळसा भरण्यासाठी वेकोलिकडे भरधाव जाणाऱ्या हायवा ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या व रेतीसाठी जाणाऱ्या ट्रॅक्टरला जबर धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅक्ट्ररवरील दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रॅक्टर चालक मनोज शंकर राॅय व मजूर रुपेश बारसागडे यांचा जागीच मृत्यू झाला तर सुनील हा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर घुग्घुस येथील संतप्त नागरिकांनी घटनास्थळ गाठल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. मृतकाला ५० लाखांची आर्थिक मदत मिळावी, यासाठी जमावाने दोन्ही बाजूच्या मार्गांवरील वाहतुक रोखून धरली. रात्री उशिरापर्यंत तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच होते. मृतदेहही घटनास्थळीच होेते. यातील जखमीला तातडीने चंद्रपूरला हलविण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, पैनगंगा कोळसा खाणीतील वाहतुकीसाठी येथील बहिरम बाबा मंदिराच्या मागून काही  दिवसांपूर्वी नवीन वळण रस्ता तयार करण्यात आला. या मार्गाने कोळशाची वाहतूक करण्यासाठी पैनगंगा कोळसा खाणीकडे भरधाव जाणाऱ्या हायवा ट्रक क्रमांक (एमएच ३४, एबी ९३६२)ने (एमएच ३४, एपी ०५०८) क्रमांकाच्या ट्रॅक्टरला जबर धडक दिली. यामध्ये ट्रॅक्टर चालक मनोज शंकर राॅय व ट्रॅक्टरवर असलेला मजूर रुपेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुनाल हा गंभीर जखमी झाला. (संबंधित वृत्त/५)

 

टॅग्स :Accidentअपघात