शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा विधानसभा क्षेत्रातील १० कंपन्या बंद

By admin | Updated: April 14, 2016 01:11 IST

राजुरा विधानसभा क्षेत्रातील विकासाची कडी जुळत असताना मागील दशकात राजुरा विधानसभा क्षेत्रातील जवळपास १० कंपन्या बंद झाल्या.

कंपनीमालक गेले कुठे ? : दोन हजार कामगारांवर उपासमारीची पाळीराजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्रातील विकासाची कडी जुळत असताना मागील दशकात राजुरा विधानसभा क्षेत्रातील जवळपास १० कंपन्या बंद झाल्या. यामुळे दोन हजार कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे.कंपन्या सुरू करताना बँकेचे ऋण घेऊन कोट्यवधीची सबसीडी काही कंपन्यांनी हडप करून पसार झाले आहे. त्यामुळे या भागातील सुशिक्षित बेरोजगार आणि ज्याच्या शेतजमिनी या कंपन्यांनी घेतल्या, त्या शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.नुकतेच कोरपना तालुक्यातील मुर्ली अ‍ॅग्रो कंपनीने टाळेबंदी घोषित केली. हजारो कार्यरत कर्मचारी बेरोजगार झाले. याला जबाबदार कोण? कंपनी सुरू करताना एखादा उद्देश असतो आणि कंपनीचा शुभारंभ होतो. कालांतराने ही कंपनी बंद पडते. मग शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या असतील तर त्या नोकऱ्या गेल्या. आता हे बेरोजगाार युवक जगणार कसे, हा प्रश्न आहे. कंपनी बंद करण्यात कोण जबाबदार आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे हरिगंगा सिमेंट कंपनी सुरू झाली. काही काळानंतर बंद झाली. चुनाळा परिसरातील अनेकांच्या जमिनी गेल्या. परिसरातील नागरिकांचे रोजगार गेले. मात्र या कंपनीच्या मालकावर अजूनपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. जोपर्यंत कडक उद्योग धोरण राहणार नाही, तोपर्यंत बेरोजगारांची, शेतकऱ्यांची अशीच थट्टा होत राहील. हरिगंगा सिमेंट कंपनी बंद झाल्यानंतर याच ठिकाणी गुप्ता मेटल सुरू झाले. काही वर्षानंतर मोठा अपघात झाला. अनेकांना प्राण गमवावे लागले. याचीसुद्धा योग्य चौकशी झाली नाही.चुनाळ्यातील असे शेतकरी ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांचे हाल झाले आहे. या भागातील नागरिकांची थट्टा होत असताना एक राजकीय नेता पुढे येऊन कंपनी बुडविणाऱ्या मालकावर कारवाईची मागणी करत नाही, फक्त मागणी करून आजच्या काळात काहीच होत नाही, जनहित याचिका टाकावी लागते, हेदेखील पुढाऱ्यांना कळायला हवे.राजुरा विधानसभा क्षेत्रामधील कंपन्यांना शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी देण्याचा करारा झाला. शेतकरी हतबल झाला तरी चालेल; पण कंपन्यांचे हित जोपासले जाते. टॅक्समध्येसुद्धा सुट देण्यात आली. यातून राजकीय नेते कंपन्यांची पाठराखन करीत आहे. (शहर प्रतिनिधी)