शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील बदलामुळे बालकात आजार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:58 IST

वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात सध्या विषाणूजन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे बालके तापाने फणफणत आहेत. तसेच जुलाब, उलटी आदी आजारांनी बालके त्रस्त होत आहेत. त्यामुळे खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे.

ठळक मुद्देआरोग्य केंद्रात कक्ष : बालकांना ताप, जुलाब, उलटीचा होऊ लागला त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात सध्या विषाणूजन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे बालके तापाने फणफणत आहेत. तसेच जुलाब, उलटी आदी आजारांनी बालके त्रस्त होत आहेत. त्यामुळे खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे.ढगाळ वातावरण, रिमझिम पावसामुळे सध्या जिल्ह्यात विषाणूजन्य आजार वाढत आहेत. त्यामध्ये व्हायरल न्यूमोनिया, व्हायरल डायरिया, विषाणू मेंदूज्वर, डोकेदुखी, ताप, हातपाय गळणे, डेंग्युसदृश्य, जुलाब, उलटी आजार वाढलले आहेत. हे आजार बालकांमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गर्दी होत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये आजारी बालकांची संख्या वाढली आहे.पावसाळा लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच पावसाळ्यात जलस्त्रोतांचे पाणी वाढते आणि या पाण्याचा उपयोग ग्रामीण भागातील नागरिक पिण्यासाठी करतात. त्यामुळे साथ रोगाचे आजार उद्भवतात. हे आजार होऊ नयेत यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.नागरिकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. लहान मुलांमध्ये व्हायरल न्यूमोनिया, तापाचे प्रमाण आढळून येत असून व्हायरल डायरियाचे प्रमाण जास्त आहे. तापाचे रुग्ण असले तरी ते क्रिटीकल नसल्याचे वैयक्तिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आजार टाळण्यासाठी स्वच्छता बाळगावी, प्रत्येकांनी शुद्ध पाणी प्यावे, विशेष करून उकळलेले पाणी प्यावे, घर परिसर स्वच्छ ठेवावा, उघड्यावरील खाद्य पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावे, नाल्यांची स्वच्छ करावी,असे आवाहनही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.विषाणूजन्य आजारबालकांंमध्ये विषाणूजन्य मेंदूज्वर, व्हायरल ताप, डेंग्यूसदृश्य आजार, जुलाब उलटी, डोकेदुखी असे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने उघड्यावरील खाणे टाळणे गरजेचे आहे. तसेच परिसराची स्वच्छता राखावी.थंड पाण्याने अंग पुसावेबालकांत तापसदृश्य आजार र्होुऊ नये यासाठी पाणी उकळून प्यावे. ताप आल्यास थंड पाण्याने संपूर्ण शरीर पुसून घ्यावे त्यामुळे डोक्यापर्यंत ताप जात नाही. तसेच जेवणात पातळ पदार्थ खावे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये, डॉक्टरांकडे जाऊनच औषधी घ्यावी.

टॅग्स :Healthआरोग्य