शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

चंद्रपूर जिल्ह्यात बैल बाजार सुरू होण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 12:19 PM

पणन संचालनालयाने काही अटी लागू करून चंद्रपूर जिल्ह्यात बैल बाजार सुरू करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीच्या सभापतींना दिल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील बैलबाजार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्दे पणन संचालनालयाने दिली परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे बैल बाजार भरविण्यास प्रशासनाने बंदी घातली. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात थोडी शिथिलता मिळाल्यामुळे काही प्रमाणात आर्थिक व्यवहार सुरू झाले. मात्र बैल बाजाराअभावी शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली होती. यावर पर्याय म्हणून पणन संचालनालयाने काही अटी लागू करून बैल बाजार सुरू करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीच्या सभापतींना दिल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील बैलबाजार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी बैलजोडीच्याच सहाय्यानेच शेती करतात. खरीब आणि रब्बी हे दोन्हीही हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकरी बैलजोडीची अदलाबदल करतात. ज्या शेतकऱ्यांकडे शेतीउपयोगी क्षमता नसलेले बैल नसतात, असे शेतकरी ऐन हंगामात बैल बाजारातून बैल खरेदी करतात. यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले. त्याचा जोरदार फटका बैलबाजाराला बसला. शेतकऱ्यांना ऐन शेतीच्या हंगामात बैल विकत घेण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या मशागतीची कामे कशी करावी, यासाठी धावपळ सुरू केली. बºयाच शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता नसल्याने ते ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे करू शकत नाही. असे शेतकरी बाजारातून बैल विकत घेतात. यंदा बैल बाजार बंद असल्याने काही शेतकऱ्यांची मशागतीची कामे अजूनही पूर्ण झाली नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्यांद्वारे जिल्ह्यातील बैल बाजार चालविले जातात. यातून बाजार समित्यांना बऱ्यापैकी महसूल मिळतो. कोरोनामुळे समित्यांचेही नुकसान झाले.लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील बैल बाजार बंद होते. यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. मशागतीची कामे कशी करावी, असा प्रश्न काही शेतकऱ्यांना पडला होता.बैल बाजार सुरू झाल्यास शेती हंगामामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.-दिनेश चोखारे,सभापती, कृषी उत्पन्नबाजार समिती ,चंद्रपूर

प्रतिबंधात्मक खबरदारी घ्यावी लागणारशेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन पणन संचालनालयाने बैल बाजार सुरू करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक व बाजार समित्यांना दिल्या. मात्र स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी प्रतिबंधात्मक खबरदारीच्या दृष्टीने निर्देश देणार आहे. बैलबाजार चालविणाऱ्या संस्थांना या निर्देशाचे पालन करावे लागणार आहे. जिल्ह्यात राजुरा, कोरपना, वरोरा, जिवती यासोबतच नागभीड, सिंदेवाही या तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने बैलबाजार भरतात.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेती