भद्रावतीचे नागरिक वाघांच्या दहशतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:01:55+5:30
मागील काही दिवसात भद्रावती परिसरात वाघ तसेच बिबट्यांचा वावर वाढला आहे. शनिवारी रात्री ११.१५ च्या दरम्यान पट्टेदार वाघाने आयुध निर्माणी परिसरात गायीवर हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली. या भागात पट्टेदार वाघ, बिबट, अस्वलसह अन्य वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहे.

भद्रावतीचे नागरिक वाघांच्या दहशतीत
सचिन सरपटवार / विनायक येसेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : भद्रावती वनपरिक्षेत्र ताडोबा-अंधारी अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रालगत असल्याने वन्यप्राण्यांचा शहर परिसरात नेहमीच शिरकाव असतो. मागील काही दिवसांमध्ये वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, रविवारी सायंकाळच्या सुमारास आयुध निर्माणी परिसरातील तीन बछड्यांसह वाघाचे दर्शन झाल्याचे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
मागील काही दिवसात भद्रावती परिसरात वाघ तसेच बिबट्यांचा वावर वाढला आहे. शनिवारी रात्री ११.१५ च्या दरम्यान पट्टेदार वाघाने आयुध निर्माणी परिसरात गायीवर हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली. या भागात पट्टेदार वाघ, बिबट, अस्वलसह अन्य वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहे.
मल्हारीबाबा सोसायटी, गौतमनगर येथे जवळपास तीन ते चार बिबट्यांचा वावर असून तेथील नागरिकांनी बिबट्यांना दर्शन दिले. कधी संरक्षण भिंत तर कधी मुख्य महामार्गावरील पुलाच्याखाली अगदी वस्तीत या वाघांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान, तीन बछड्यांसह पट्टेदार वाघ दिसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. त्यानंतर मैदानाच्या बाजुला असलेल्या तळ्याच्या पारीवरही हे वाघ मस्ती करतानाही काहींनी बधितले.
बंद कोळसा खाण परिसरात वाघांचे वास्तव
तालुक्यातील कर्नाटक एम्टा, डागा माइंस, तेलवासा ,ढोरवासा, चारगाव येथील कोळशाच्या खाणी बंद असल्याने मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहे. त्यामुळे या क्षेत्रात अन्य वन्यप्राण्यांनी मोठ्या संख्येने आहे. शिकार मिळत असल्याने वाघांचेही या ठिकाणी बस्तान आहे. येथील वाघांनी ताडोबा, डिफेन्स , जेना पहाडी, सिरणा नदी ते तेलवासा - ढोरवासा, यवतमाळ जिल्ह्यातील उकनी असा नवीन ग्रीन कॉरिडोर तयार केला असल्याने वाघांच्या रक्षणासाठी व मानवांच्या बचावासाठी या भागात वनविभागाने सूचना फलक सुद्धा लावला आहे.
वाघाच्या हल्यात गाय जखमी
पट्टेदार वाघाच्या हल्यात गाय जखमी झाल्याची घटना आयुध निर्माणी परिसरात शनिवारी रात्री ११.१५ सेक्टर ५, टाईप ४ येथे घडली. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास वाघाने एका गाईवर हल्ला केला. गाय नालीत पडली. आवाज आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. त्यानंतर घटनास्थळावर नागरिकांनी जावून जखमी गायीचे प्राण वाचविले, असे प्रत्यक्षदर्शी संजय टिकले तथा नगरसेविका सुनिता टिकले यांनी सांगितले. अर्धवट शिकार झाली असेल तर त्या ठिकाणी वाघ पुन्हा येतो. याही ठिकाणी तेच घडले. रात्री १ च्या सुमारास तो वाघ त्याच ठिकाणावर आल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.